ज्येष्ठ विचारवंत तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते तसेच शेतकऱ्यांचेआधारस्तंभ प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांच्या निधनामुळेरक्कम शेतकऱ्यांच्या आधारस्तंभ हरपला आहेत.प्राध्यापक ते सहकार मंत्री अशी विविध पदेभूषवणारेप्रा. एन. डी. पाटील यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
प्रा. एन. डी. पाटील यांचा जीवन प्रवास
त्यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी नागाव गावात अशिक्षित असलेल्या शेतकरी कुटुंबात झाला. सन 1955 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात एमए केले. त्यानंतर पुणे विद्यापीठ आतूनच एल एल बी ची पदवी 1962 मध्ये पूर्ण केली. सन 1954 ते 57 या कालावधीत सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1960 साली इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून रुजू झाले.
भारतीय समाजातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी विविध योजना….
आयटीआय, साखर शाळा,आश्रम शाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, कमवा व शिका या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे,गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक आदी योजना त्यांनी सुरू केल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्य शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्याला त्यांनी चालना दिली.
प्रा. एन. डी.पाटील यांचा राजकीय प्रवास….
- 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
- 1957 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
- 1960-66,1970-76,1976-82 असे अठरा वर्ष महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य
- 1969-78,1985-2010 शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस
- 1978-80 मध्य सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य
- 1985-1990 मध्य महाराष्ट्र विधानसभा सदस्य
- 1999-2002-निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
- महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
Share your comments