मुंबई
राज्यात दिवसेंदिवस बोगस खत विक्रीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पीक न उगवल्यामुळे यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतं. बोगस खतांबाबत बीडमधील तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई केली आहे.ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या खत कंपनीचा विक्री परवाना कृषी विभागाने निलंबित आहे.
या कारवाईनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे ट्विट करुन अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती.
राज्यात बोगस बियाणे आणि खतविक्री वाढली आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी बोगस खत विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करणार असल्याचे आश्वासनही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशनात दिले आहे. या अंतर्गत बोगस विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी अधिवेशनातून मागील काही दिवसांपूर्वी दिली होती.
Share your comments