1. बातम्या

‘सीड चेन डेव्हलपमेंट’ उच्च कृषी उत्पादनाची गुरुकिल्ली

केंद्राकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या अथक प्रयत्नांदरम्यान, ‘सीड चेन डेव्हलपमेंट’ला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. शाश्वत शेतीसाठी बियाणे हे मुलभूत आणि सर्वात महत्वाचे इनपुट आहे.

‘Seed Chain Development’ is the key to high agricultural production

‘Seed Chain Development’ is the key to high agricultural production

केंद्राकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या अथक प्रयत्नांदरम्यान, ‘सीड चेन डेव्हलपमेंटला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. शाश्वत शेतीसाठी बियाणे हे मुलभूत आणि सर्वात महत्वाचे इनपुट आहे. इतर सर्व इनपुटचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. असा अंदाज आहे की एकूण उत्पादनामध्ये केवळ दर्जेदार बियाणांचे थेट योगदान हे पिकावर अवलंबून सुमारे १५ ते २०% आहे आणि ते इतर निविष्ठांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाने ४५% पर्यंत वाढवता येऊ शकते.

शेतीसाठी चांगल्या बियाण्यांच्या उपलब्धतेमुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढते, परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त होते आणि कृषी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होण्यासोबतच GDP मध्ये शेतीचा वाटा वाढतो. एका कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनीही 'सीड चेन डेव्हलपमेंट'वर अधिक भर दिला आणि सांगितले की, काळाबाजार आणि बनावट विक्रीला कठोरपणे आळा घालून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांचा वेळेवर पुरवठा झाला पाहिजे.

तोमर म्हणाले की, संपूर्ण बियाणे साखळी योग्य प्रकारे सुव्यवस्थित करावी जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. याशिवाय ज्या पिकांच्या बियाणांचा विशिष्ट भागात तुटवडा आहे, त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे जेणेकरून उत्पादकता वाढू शकेल. कडधान्य-तेलबिया, कापूस इत्यादी पिकांच्या बियाणांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे.

या प्रक्रियेत, बियाणे शोधून काढण्यासाठी राज्य सरकारांचे सहकार्य देखील आवश्यक आहे, जेणेकरून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि ते आवश्यकतेनुसार त्यांच्या लागवडीसाठी बियाण्यांबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शेतीतील उत्पादकता वाढविण्यावर तसेच खर्च कमी करण्यावर भर देतात.

या संदर्भात भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या बियाणांचे वाण तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासोबतच राज्यांनी जिल्हा स्तरावर कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व बाबींवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. यावेळी केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, पंचायत स्तरापर्यंत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच बियाणांच्या गुणवत्तेची चाचणी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी.

महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो असा प्रयोग का करत नाही? भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा, झाले मालामाल

English Summary: ‘Seed Chain Development’ is the key to high agricultural production Published on: 26 May 2022, 04:05 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters