MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

काही दिवसात पेट्रोल,डिझेलच्या वापराला बसू शकतो पूर्णविराम; स्कूटर बाईक धावतील इथेनॉलवर: नितीन गडकरी

येणाऱ्या दिवसांमध्ये स्कूटर आणि बाईक तसेच इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉल वर चालतील. इथेनॉल वापरामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून पूर्ण मुक्तता होईल, तसेच या बाबतीत केंद्र सरकार लवकरच कायदा तयार करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nitinji gadkari

nitinji gadkari

येणाऱ्या दिवसांमध्ये स्कूटर आणि बाईक तसेच इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवरचालतील. इथेनॉल वापरामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून पूर्ण मुक्तता होईल, तसेच या बाबतीत केंद्र सरकार लवकरच कायदा तयार करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.

त्यांनी सांगितले की, मी एक लवकरच कायदा बनणार असून त्यानंतर स्कूटर, बाईक आणि ऑटो रिक्षा अधी पेट्रोल वर न चालता ही वाहने 65 रुपये लिटर च्या शंभर टक्के इथेनॉलवर चालतील. इथेनॉलच्या वापरामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.

नितीन गडकरी हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे च्या दोन दिवसांच्या निरीक्षण दौऱ्यावर असताना राजस्थान मधील दौसात त्यांनी ही घोषणा केली. पुढे ते म्हणाले की एक्सप्रेसचा बांधकामामध्ये पर्यावरणाकडे विशेष रीतीने लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून देशातून पेट्रोल आणि डिझेल चा वापर पूर्णपणे थांबवण्याचा माझा प्रयत्न आहे.

आपल्या देशातील शेतकरी पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय देतील. इथेनॉलच्या वापरासाठी मी 2009 पासून प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले. किचनची उत्पादन सध्या वाढले आहे आधी त्यासाठी उसाचा वापर होत असे.आता मका, तांदूळ आणि गव्हाचा वापर केला जात आहे त्यामुळे लवकर पेट्रोलची जागा इथेनॉल घेईल.

English Summary: scooter and bike ride on ethenol will come new law about that Published on: 18 September 2021, 08:53 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters