1. बातम्या

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर वैज्ञानिकांना अधिक भर द्यावा

नवी दिल्ली: देशातल्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर अधिक भर देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिक समुदायाला केले. छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी हे सर्वात असुरक्षित असून त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे असे ते म्हणाले.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
देशातल्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर अधिक भर देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिक समुदायाला केले. छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी हे सर्वात असुरक्षित असून त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे असे ते म्हणाले. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या 58 व्या दिक्षांत समारंभात ते संबोधित करत होते. देशातल्या अन्नधान्याच्या उत्पादनात गेल्या 68 वर्षात अंदाजे सहा पटीने झालेली वाढ लक्षात घेता त्यांनी हरित क्रांतीनंतरच्या टप्प्यात कृषी संशोधन संस्थेने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच संस्थेचे संशोधन शेतापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले. शेतीमधील वैज्ञानिक प्रगती आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाची सेवा केली जावी, अशी सूचना त्यांनी केली. देशात कुपोषण आणि उपासमारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. देशातले 80 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांची उपासमार होत आहे. देशातील युवक हे देशाचा कणा आहेत त्यामुळे या समस्येवर युद्धपातळीवर तोडगा काढण्यात यावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

नायडू यांनी कृषी संशोधन संस्थांना रोग प्रतिबंधक आणि पोषक मूल्य असलेली पिकं विकसित करण्याचे आवाहन केले. किटकनाशकांच्या अतिवापराच्या धोक्याबाबत लोकांना जागृत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी योग्य धोरणं, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक व्यवस्था यांची जोड असणे महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 12 शेतकऱ्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. यातून त्यांचे मनोधैर्य वाढवायला मदत होईल, असे नायडू म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी एमएससी आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदकं प्रदान केली.

English Summary: Scientists should focus more on increasing the productivity of small and marginal farmers Published on: 18 February 2020, 09:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters