1. बातम्या

एसबीआयची अंध नागरिकांसाठी सुविधा; पैसे भरण्यासाठी बँक कर्मचारी येणार घरी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
एसबीआयची अंध नागरिकांसाठी सुविधा

एसबीआयची अंध नागरिकांसाठी सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक आनोखी सुविधा चालू केली आहे. म्हणजे ग्राहकांना आता आपल्या कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बँकेचे सर्व कामे तुम्ही आता घरी बसून पुर्ण करु शकणार आहात. आता तुम्ही म्हणाल हे कस, तर हे असेही आहे की,  बँकेचे कर्मचारी स्वतः तुमच्या दाराशी येतील, आणि तुमचे काम करतील.

 

बँकेचे कोणतेही काम म्हटलं तर बँकेत लागलेल्या रांगा आज चिंतेचा विषय असतो. त्यातच जेष्ठ नागरिकांना फारच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बराच वेळ हा वाया जात असतो, परंतु एसबीआयच्या या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना आता बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये पैसे काढायचे असतील किंवा टाकायचे असतील तर आता काळजी करण्यासारखे काहीच नाही. कारण बँकेचे कर्मचारी स्वतः तुमच्या दाराशी येईल. एसबीआयने सुरू केलेल्या या सुविधेचे नाव आहे डोअर स्टेप सुविधा. जाणून घेऊया या सुविधेबद्दल.

या सुविधेच्या माध्यमातून एका फोन कॉलवर बँकेचे कर्मचारी ग्राहकाच्या घरी जातात. त्यानंतर ते ग्राहकांना लागणाऱ्या सुविधा पुरवतील. यात खास म्हणजे तुम्हीच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुम्ही चेक, डिमांड ड्राफ्ट, ते ऑर्डरचे पिकप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट इत्यादी बाबतच्या सर्व सुविधा तुम्हाला घरबसल्या अनुभवता येतील.

 

स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देतांना म्हटले की, तुम्हाला जर डोअर स्टेप बँकिंग या सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर ग्राहकांनी 18001037188, 10881213721 या टोल फ्री नंबरवर फोन करावा.

या सुविधेचा लाभ कसा घ्यावा?

 या सुविधेचा फायदा घेण्यासाठी एप, संकेतस्थळ किंवा कॉल सेंटर द्वारे ग्राहकांना त्यांचे नाव रजिस्टर करावे लागते. बँकेला असलेल्या सुट्टीचे दिवस वगळता कामकाजाच्या दिवशी फोन करून ग्राहक आपले नाव नोंद करू शकतात. स्टेट बँकेच्या खास सुविधेसाठी बँकेच्या https://bank.sbi/dsb या खूप संकेतस्थळाला भेट देऊनही ग्राहकांना अधिकची माहिती मिळू शकेल.

 

या सुविधेचा फायदा कुणासाठी?

 ही सुविधा ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सोबतच दिव्यांग आणि अंध नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. जर काहींची जॉइंट खाते असेल तर अशा ग्राहकांना या सुविधेचा फायदा मिळणार नाही. तसेच अल्प बचत आणि करंट खात्याचा ग्राहकही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters