MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

वृद्ध व्यक्तींसाठी एसबीआयची स्पेशल डिपॉजिट स्कीम

देशातल्या सर्वात मोठ्या बँकेने देशातील वृद्ध नागरिकांसाठी एक सरप्राईज ऑफर दिली आहे. बँकेने वृद्ध नागरिकांसाठी स्पेशल डिपॉजिट स्कीमची ( विशेष ठेव योजना ) घोषणा केली आहे.

KJ Staff
KJ Staff


देशातल्या सर्वात मोठ्या बँकेने देशातील वृद्ध नागरिकांसाठी एक सरप्राईज ऑफर दिली आहे. बँकेने वृद्ध नागरिकांसाठी स्पेशल डिपॉजिट स्कीमची ( विशेष मुदत ठेव स्कीम) घोषणा केली आहे.  या स्कीमचे नाव आहे, एसबीआय वी केअर सिनिअर सिटीझन्स टर्म डिपॉजिट स्कीम आहे.  या स्कीममध्ये १२ मे २०२० पासून गुंतवणूक करु शकता.  वृद्ध नागरिकांच्या घटत्या दरामध्ये जास्त व्याज देणेचे उद्दिष्ट असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. या श्रेणीतील गुंतवणूकदार सामान्यत: व्याज उत्पन्नावर अवलंबून असतात. अलीकडेच बँकांनी व्याजदरात कपात केली आहे.  यामुळे भारतीय स्टेट बँकेने ही स्कीम लॉन्च केली आहे.

कोण करु शकतो या स्किममध्ये गुंतवणूक - देशातील वृद्ध व्यक्ती ज्यांचे वय वर्ष ६० ते त्यापेक्षा अधिकचे वय असलेलेल व्यक्ती या स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतील. हे घरगुती मुदत ठेव योजना आहे. यासाठी अनिवासी भारतीय म्हणजे एनआरआय यांना या स्कीमचा लाभ घेता येणार नाही. साधरण एफडीवर म्हणजे मुदत ठेवीवर जेवढा व्याज मिळतो त्यापेक्षा ०.८ टक्के अधिकचा व्याज या स्कीममध्ये मिळतो. स्कीमच्या माध्यमातून साधरण ५ वर्ष ते १० वर्षापर्यंत ठेव ठेवली जाऊ शकते. मुदत ठेवीवरील व्याजाचे देयक ही मासिक म्हणजे महिन्याला किंवा तीन महिन्यांनी केली जाईल. दरम्यान सहामाही आणि वार्षिक व्याज देण्याचा पर्याय आहे का याची अजून माहिती मिळालेली नाही. या स्कीमची मुदत ही ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची आहे.

जर आपल्याला या स्कीमचा लाभ घ्यायाचा असेल गुंतवणूक करायाची असेल तर जेष्ठ नागरिकांनी एसबीआयच्या शाखेत जावे. योनो एप्प आपल्याकडे असेल तर आपण त्या एप्पच्या माध्यमातूनही एफडी करू शकता. फिक्स्ड डिपॉजिटवर वृद्ध व्यक्ती कर्जही घेऊ शकतात. आपल्या ठेवीचा कालावधी संपण्याआधी जर आपण एफडी मोडली तर आपल्याला मिळणारा अतिरिक्त ०.३० टक्के व्याज मिळणार नाही.

English Summary: sbi start new scheme for senior citizenes, know the features Published on: 13 May 2020, 11:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters