कोरोनामुळे देशासह जगात आर्थिक संकट ओढवणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी अनेक देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आपल्या देशातही पंधरादिवसांपासून लॉगडाऊन चालू आहे. यामुळे देशातील उद्योग धंदे बंद आहेत. कोरोनाचे संकट देशातून गेल्यानंतर सरकार पुढे आणि बँकांपुढे आर्थिक संकट उभे राहणार आहे. कोरोनाच्या संकटात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही, तसेच कर्जाचे हफ्ते बँकांनी तीन महिन्यांनंतर ग्राहकांकडून घ्यावे, असे निर्देशही अर्थ मंत्रालयाने दिले आहेत.
याच दरम्यान भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यांच्या व्याजदरात कपात केल्याची माहिती मिळाली आहे. पण बँकेने कर्ज घेणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यामुळे वाहनासाठी आणि घरासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भारतीय स्टेट बॅक (एसबीआय) आपल्या बचत खात्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. साधारण तीन टक्क्याहून २.७५ टक्के वार्षिक व्याज दर केले आहे. हे नवीन व्याजदर १५ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याविषयीचे वृत्त इकोनॉनिक्स टाईम्स ने दिले आहे.
सेव्हिंग डिपॉजिट रेट कमी करणाऱ्या एसबीआयने कर्जावरील व्याजदही कमी केले आहेत. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये ०.३५ टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पर्सनल आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. हे नवीन दर १० एप्रिलपासून लागू होणार आहेत. एमसीएलआर मध्ये कपात केल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदरात ७.७५ टक्क्यांनी कमी होऊन वर्षाला ७.४० टक्के होईल असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. तीस वर्षाच्या गृह कर्जावरील मासिक हफ्त्यात प्रति एक लाख रुपयांच्या कर्जातून २४ रुपये कमी होतील. एसबीआयने साधारण ११ व्या वेळा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. बचत खात्यांवरील व्याज का कमी करण्यात आले आहेत यामागील कारणही बँकेने सांगितले आहे. बँकांकडे पुरेसा नकदी पैसा असल्यामुले बचत खात्यांवरील व्याज दरात ०.२५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्याजदरात कपात केल्यानंतर एक लाखाच्या बचत असलेल्या बॅलन्सवर २.७५ टक्के व्याज मिळेल. एक लाख रुपयांपेक्षा अधिक बाकी असेल तरी हेच दर लागू होणार आहेत.
Share your comments