हापूस आंब्याचे ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटत असेल, तर यावर संशोधकांनी गांभीर्याने विचार करायलाच हवा. अत्यंत प्रतिकूल अशा हवामानामुळे राज्यात द्राक्षाचे क्षेत्र निम्म्याने घटेल, असे यातील जाणकारांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता घटत्या हापूस आंबा उत्पादनामुळे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग चांगलाच संकटात सापडला आहे.
गेल्या वर्षी विपरीत हवामानामुळे ४० ते ५० टक्के आंबा उत्पादन घटले. या वर्षी तर हापूस आंब्याची परिस्थिती फारच बिकट आहे. अतिवृष्टी लांबत असलेल्या पावसाने मोहोर प्रक्रिया बिघडत आहे. हापूसला मोहोर टप्प्याटप्याने येत आहे, आंबा ऐन मोहरात असताना सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने मोहोर गळून जातोय.
आंबा पक्व होताना आलेल्या उष्णतेच्या लाटेने आणि आता पक्व होऊन काढणीला सुरुवात झाल्यावर वादळी पाऊस आणि गारपिटीने आंब्याचे खूप नुकसान झाले आहे. या वर्षी तर हवामानातील अशा बदलाने आंब्याचे केवळ १५ टक्केच उत्पादन मिळेल, असा अंदाज वर्तविला जातोय.
सदाभाऊ खोत यांचा गेटवरून उडी घेत पुणे महानगरपालिकेत प्रवेश, शेतकऱ्याचे वाहन जप्त केल्याने आक्रमक..
खर्च सातत्याने वाढत असताना आंब्याचे उत्पादन मात्र घटत आहे. आंबा उत्पादकांना हा दुहेरी फटकाच म्हणावा लागेल, हापूसचे उत्पादन हाती लागेपर्यंत निसर्ग कधी दगा देईल ते सांगता येत नाही.
हापूसचे उत्पादन मिळाल्यानंतरही क्लस्टरनिहाय मूल्यसाखळी विकसित न झाल्यामुळे म्हणावा तसा दर मिळत नाही. या वर्षी तर हापूसचे उत्पादन कमी असले तरी उत्पादकांना कमीच दर मिळतोय. हापूस आंब्याला उत्पादकांच्या पातळीवर दर्जानुसार ३००-६०० रुपये प्रतिडझन दर मिळत आहे.
'बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येतीय यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही'
कॅनिंगसाठी हापूस उपलब्धच होतो की नाही, असे सध्याचे चित्र आहे. कारण कमी प्रतीचे, डागाचे आंबेसुद्धा खाण्यासाठी विकले जात आहेत, अशावेळी लहान मोठे प्रक्रिया उद्योग चालू ठेवण्यासाठी आंबा खरेदी करायचा म्हटला तर त्यासाठी उद्योजकांना पण अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आंबा पोळीपासून ते पल्पपर्यंत अशा सर्वच प्रक्रियायुक्त पदार्थांचे दर या वर्षी वाढले तर नवल वाटायला नको.
फळाचा राजा हापूस आणि त्याच्या उत्पादकांना वाचवायचे असेल, तर बाग व्यवस्थापनापासून ते प्रक्रिया निर्यातीपर्यंत आमूलाग्र बदल करावा लागेल. आंबा बागेत छाटणीचे नियोजन करून मोहर एकाच वेळी कसा येईल, हे पाहायला हवे. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीतही अपेक्षित उत्पादन आंबा उत्पादकांच्या हाती लागेल, यासाठीची तत्काळ सल्ला देणारी यंत्रणा हापूस क्लस्टरमध्ये कृषी आणि हवामानशास्त्र विभागाने निर्माण करायला पाहिजेत.
पाकिस्तानमध्ये पेट्राेल २८२ रुपये लीटर, देशात मोठे आर्थिक संकट
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..
राज्यावर वादळी पावसाचे सावट कायम, शेतकऱ्यांनो पुढील काही दिवस काळजी घ्या..
Share your comments