गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात बालविवाहाचे (child marriage) प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यांत बालविवाह रोखण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बालविवाह रोखण्यासाठी मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन बाजूला, तर ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरात बालविवाह आढळून आल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात कुचराई झाल्यास समितीमधील सदस्यांना जबाबदार धरुन पदावरुन बाजूला अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तालुका बाल संरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बाल विवाह व अन्य संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात; यांच्या गळ्यात पडणार मंत्री पदाची माळ?
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Spider Plant: घरी लावा स्पायडर प्लांट; 'या'' मोठ्या समस्यांपासून मिळवा मुक्ती
Share your comments