दरवर्षी सांगोला तालुक्यामध्ये डाळिंब फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जवळपास मागील दहा वर्षापासून नाशवंत मालासाठी शीतगृह उभारण्याची मागणी चालू आहे जे की अत्ता त्या मागणीला कुठेतरी मुहूर्त मिळाला असून राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सांगोला तालुक्यात सुमारे २ कोटी रुपयांचे जवळपास ८४० मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारले गेले आहे.हे शीतगृह तेथील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे जे की आधी शेतकऱ्यांच्या डाळिंबाचे नुकसान होयचे मात्र आता शितगृहामुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबाचे नुकसान होणार नाही.
शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शीतगृह देण्यास मान्यता:
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून जवळपास ७५ टक्के तर वखार महामंडळ कडून २५ टक्के असे १०० टक्के मिळून २ कोटी रुपयांचा निधी या शीतगृह साठी प्राप्त केला होता. सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग डाळिंबाचे उत्पादन घेतात आणि त्यांचा जो माल होता त्याच्या साठवणुकीसाठी कोणतेही साधन तिथे प्राप्त न्हवते त्यामुळे २०१० साली वखार महामंडळाने तेथील शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शीतगृह देण्यास मान्यता दिलीपरंतु मागील खूप दिवसापासून सांगोला जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची ही मागणी राखीव होती पण अखेर या मागणीला मान्यता दिली असून शीतगृह उभारण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर तेथील कृषी उत्पन्न समितीने २० गुंठे जागा दिली असून तिथे १८०० मेट्रिक टन क्षमतेचे शितगृह उभारले आहे. कृषी उत्पन्न समितीने ३०००० भाडे तत्वावर ही जागा दिलेली आहे. आता तेथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असून डाळिंब बरोबर इतर शेतीमाल सुद्धा ठेवण्यासाठी त्या शितगृहाचा वापर शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्यातील दुसरे मोठे शीतगृह:
शेतीच्या उत्पादनाबरोबरच शेतीचा माल कुठे साठवायचा हा सर्वात महत्वाचा मुद्धा सुद्धा समोर आलेला होता.सांगोला तालुक्यातील दुर्गम भागात अनेक दिवसापासून तेथील शेतकरीडाळिंबाचे उत्पादन घेत आहेत.उत्पादन तर मोठ्या प्रमाणात निघत होते मात्र डाळिंब म्हणजे नाशवंत माल आणि नाशवंत माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध न्हवती त्यामुळेदिवसेंदिवस उत्पादन घटत चालले होते. महाराष्ट्र राज्यातील सांगोला तालुक्यात दुसरे मोठे शीतगृह तर पुणे विभागात सर्वात मोठे म्हणजेच पहिले शीतगृह उभारण्यात आले आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या शीतगृहाची वैशिष्टे:
या शितगृहाचे तीन भागात विभागणी केली आहे तसेच यामध्ये ० ते ४ डिग्री सेल्सिअस तापमान असणार आहे आणि याचमुळे नाशवंत माल टिकून राहील. या शितगृहात २४ तास लाईट तसेच जनरेटर, कीटक नियंत्रण सारखी सोय असणार आहे.
आता निर्यातीचाही मार्ग मोकळा:
आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा डाळिंब साठवण्याचा मार्ग मोकळा झाला असून नाशवंत माल आजिबात खराब होणार नाही.
Share your comments