लातूर जिल्ह्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात एक टक्का सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील ११५ सोसायट्या तोट्यात असून या सोसायट्याना बाहेर काढण्यसाठी प्रयत्न केला जाणार असून सर्व सोसायट्याना १२ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. दरम्यान बँकेच्या कामकाजाबाबतच्या खोडसाळपणाने तक्रारी येत असतात.
६० कोटींची कर्जे माफ केल्याची तक्रार केली आहे. ते सिद्ध झाले तर मी भर चौकात फाशी घेईल, अशी कर्जमाफी सर्वसाधारण सभेत होत असते. कोणीतरी सुपारी घेऊन तक्रार करतो. त्यामुळे गैरसमज नको, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Share your comments