1. बातम्या

शेतकरी मित्रांनो या झाडाची लागवड करा आणि कमवा करोडो रुपये; जाणून घ्या याविषयी सविस्तर

अलीकडे शेतकरी बांधव शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकाला फाटा देत नवीन नगदी पिकांची लागवड करीत आहेत, यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील मिळत आहे. पारंपारिक पिकाला उत्पादन खर्च अधिक येतो आणि त्या बदल्यात प्राप्त होणारे उत्पन्न हे खूप थोकडे असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवली आहे आणि नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास 60 टक्के जनसंख्या ही केवळ शेती क्षेत्राशी संबंधित आहे. असे असले तरी, अनेक लोक शेतीला फायद्याचा सौदा म्हणत नाहीत शेतकरी बांधव देखील शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे सांगत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Sandalwood Farming

Sandalwood Farming

अलीकडे शेतकरी बांधव शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकाला फाटा देत नवीन नगदी पिकांची लागवड करीत आहेत, यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील मिळत आहे. पारंपारिक पिकाला उत्पादन खर्च अधिक येतो आणि त्या बदल्यात प्राप्त होणारे उत्पन्न हे खूप थोकडे असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवली आहे आणि नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास 60 टक्के जनसंख्या ही केवळ शेती क्षेत्राशी संबंधित आहे. असे असले तरी, अनेक लोक शेतीला फायद्याचा सौदा म्हणत नाहीत शेतकरी बांधव देखील शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे सांगत असतात.

कृषी वैज्ञानिकांच्या मते, शेतकरी बांधव अद्यापही मोठ्या प्रमाणात पारंपारिक पिकाची लागवड करीत आहेत, त्यामुळे शेती क्षेत्रातून अपेक्षित असे उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत मोठा आमूलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. आता शेतकऱ्यांना नगदी आणि मागणीमध्ये असणाऱ्या पिकाची लागवड करावी लागणार आहे. आज आपण मागणीमध्ये असणारे चंदन या झाडाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. चंदनचे झाड सर्वात जास्त महागडे असते आणि यापासून दर्जेदार उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळू शकते या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव सहजरीत्या लाखो करोडो रुपये कमवू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात चंदनला सर्वात जास्त मागणी असते. असे असले तरी, चंदनची मागणी अद्यापही पूर्ण होऊ शकत नाही. कारण की चंदनची खूप कमी प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर चंदन लागवड केली तर त्यांना यापासून बक्कळ नफा प्राप्त होऊ शकतो. चंदन जैविक पद्धतीने देखील उगवले जाऊ शकते जैविक पद्धतीने उगवण्यासाठी चंदनाच्या झाडाला 10 ते 15 वर्ष लागतात आणि जर पारंपारिक पद्धतीने त्याची लागवड केली तर जवळपास 20 ते 25 वर्षे चंदनाचे झाड परिपक्व होण्यास लागू शकतात.

चंदनाचे झाड वाळवंटी आणि बर्फाळ प्रदेश वगळता सर्वत्र चंदन वाढू शकते. चंदनचा उपयोग फर्निचर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे याशिवाय याचा उपयोग कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो या दोघांपेक्षाही अधिक चंदनचा उपयोग आयुर्वेदिक औषध निर्मिती करण्यासाठी केला जातो. चंदनची लागवड केल्यानंतर लगेच उत्पन्न प्राप्त होऊ शकत नाही यासाठी आपणास काही कालावधी प्रतीक्षेत राहावे लागू शकते याची लागवड ही दीर्घकालीन लाभ देण्यास सक्षम आहे. चंदन लागवड केल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी त्याचे झाड परिपक्व होण्यास सुरुवात होते, आठ वर्षानंतर चंदनच्या झाडात हार्ड वूड बनण्यास सुरवात होते. असे सांगितले जाते की, चंदन चे झाड लागवड केल्यापासून सुमारे पंधरा वर्षांनी उत्पादन देण्यास सज्ज होते, म्हणजे पंधरा वर्षानंतर चंदनाच्या झाडाचे लाकूड उपयोगात आणले जाऊ शकते. जेव्हा चंदनाचे झाड मोठे होते तेव्हा त्यापासून 15 ते 20 किलो लाकूड सहजरीत्या प्राप्त केले जाऊ शकते. चंदनाचे लाकूड बाजारात जवळपास सात हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री होत असते कधी कधी तर चंदन ची किंमत ही जवळपास दहा हजार रुपये प्रति किलो एवढी देखील नमूद करण्यात आली आहे. 

असे असले तरी सरकारने चंदन लाकूड सामान्य माणसांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली आहे. परंतु कोणताही शेतकरी चंदनाची लागवड करू शकतो आणि याची खरेदी खुद्द सरकार करत असते चंदनाची लागवड करण्यासाठी आपणास चंदनाची रोपे खरेदी करावी लागणार आहेत चंदनाची रोपे बाजारात शंभर ते दीडशे रुपयांच्या दरम्यान मिळत असतात. कृषी वैज्ञानिकांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रातील चंदनचे झाडे 15 वर्ष जोपसण्यासाठी सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. मात्र, यापासून 15 वर्षानंतर जवळपास दीड कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते.

English Summary: Sandalwood Farming is very profitable Published on: 19 February 2022, 12:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters