1. बातम्या

‘समृद्धी’चे काटे: कालचे जमीनदार, आज भूमिहीन; कोट्याधीश शेतकऱ्यांना मिळेना जमिनी

अहमदनगर- बहुचर्चित मुंबई-नागपूर महामार्गाचे(Mumbai-nagpur highway) काम सध्या प्रगतीपथावर आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पदरी भरपाई म्हणून कोट्यावधी रुपये पडले. मात्र, विस्थापित शेतकऱ्यांची भरपाईच्या पैशातून पुन्हा जमीन खरेदी करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. कोट्यावधी रुपये खिशात असताना देखील शेतकऱ्यांना पुन्हा शेतजमीन मिळणे अशक्य होत आहे.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
samridhi highway

samridhi highway

अहमदनगर-   बहुचर्चित मुंबई-नागपूर महामार्गाचे(Mumbai-nagpur highway) काम सध्या प्रगतीपथावर आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पदरी भरपाई म्हणून कोट्यावधी रुपये पडले. मात्र, विस्थापित शेतकऱ्यांची भरपाईच्या पैशातून पुन्हा जमीन खरेदी करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. कोट्यावधी रुपये खिशात असताना देखील शेतकऱ्यांना पुन्हा शेतजमीन मिळणे अशक्य होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व परिसरातील तालुक्यात गेल्या दहा वर्षात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आले. शिर्डी विमानतळ (Shirdi airport), समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. प्रत्यक्ष विमानतळ आणि बायपासकरिता परिसरातील गावांतील अनेकांनी जमिनी दिल्या. कमी श्रमात अधिक दाम मिळत असल्याने अनेकांनी जमिनीवर पाणी सोडण्यात धन्यता मानली.

जमीन देतं का कुणी?

समृद्धी महामार्गात विस्थापित झालेले शेतकरी पुन्हा नव्याने जमीनीच्या शोधात आहेत. खिशात कोट्यावधी रुपये असताना नव्याने जमीन खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहे. आवश्यक क्षेत्रात जमीन उपलब्ध होत नाही. सध्या शेतजमीन विक्रीसाठी काढली जात नाही. प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्प, पुणे-सिन्नर-नाशिक रेल्वेमार्ग यामुळे सध्या जमीनीचे अर्थकारण तेजीत आले आहे. मूळ शेतकरी आपली जमीन सोडण्यास तयार नाही.

 

पैसा आला, जमीन गेली:

जमीन विकून आलेला पैसा पुन्हा अचल संपत्ती निर्माण होण्याचे प्रमाण फार कमी आहे. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत तयार होत नाही आणि खात्यात असलेले पैसे टिकत नाही.चार चाकी गाड्यांच्या कंपनीचे सेल्स एजंट येथे तळ ठोकून असतात. बँक खात्यात काही कोटी रुपयांची रक्कम असताना महिन्याला पगारासारखा किती वाट्याला येईल याचा हिशोब येथे सुरू असतो. आर्थिक अज्ञान मोठ्या प्रमाणावर असल्याने जमा-खर्चाचा हिशोब जुळत नाही.

 शिर्डी विमानतळानंतर समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले. या परिसरात सेल्स एजंट मोठया प्रमाणावर आहेत. संपले पैसे की विक गुंठा हेच सर्रास चित्र आहे.

काही वर्षापूर्वी साई मंदिर परिसरातील जमीन विकून पैशाच्या राशीत खेळणाऱ्यांची शिर्डीतील 'गुंठामंत्र्यांची'अवस्था आज बिकट आहे.

भूमिपुत्रच ठरतोय उपरा:

शेतकऱ्यांच्या जमिनीवर दाक्षिणात्यांची हॉटेल आहेत आणि हॉटेलबाहेर वॉचमेनच्या वेषात शिट्टी मारणारा भूमिपूत्र आहे. एक वेळ अशी येते पोट भरण्यासाठी जमीन नसते आणि विकून आलेला पैसाही हातात नसतो. आपल्याच जमिनीवर आपण 'उपरे' ठरतो. विकास म्हणजे कशासी खातात याच सोयरसूतक नसणारा विचार नवा 'मूळशी' पटर्न जान्माला घालू शकतो.

English Summary: samrudhi national highway more farmer landless Published on: 01 October 2021, 05:06 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters