राज्यातील ज्या ज्या शहरांमध्ये सिटीसर्वे झाले आहे तरीदेखील सातबारा उतारा सुरू आहे,अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्या ठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्डसुरू ठेवण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे
.त्यासाठी विभागाने खास एन आय सी च्या मदतीने एक संगणक प्रणाली विकसित केली आहे.सध्या विभागाकडूनप्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीचा वापर फक्त हवेली तालुक्यातमाहिती जमा करण्यासाठी केला जाणार आहे. याबाबतीतली विशेष माहिती म्हणजे,राज्यातील अनेक शहरांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वेळी होणारी फसवणूक यामुळे टळणार आहे.प्रायोगिक तत्त्वावर हाप्रकल्प हवेली तालुक्यात राबवला जाणार आहे.
तिथे या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर संपूर्ण राज्यभरात हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमावबंदी आयुक्त निरंजन सुधांशु यांनी दिली.हा निर्णय यामागील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उताराचा वापर केला जातो.
त्यामुळे बऱ्याचदा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये फसवणुकीचे प्रकार घडतात वदिवसेंदिवसत्यामध्ये वाढचहोत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने सिटीसर्वे झालेल्या शहरांमधील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Share your comments