1. बातम्या

जागतिक दिलासादायक मोठी बातमी: रशियाकडून युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदीची घोषणा

गेल्या दहा दिवसापासून रशियाने युक्रेन वर आक्रमण करून मोठा विध्वंस घडवून आणला होता.युक्रेन आदेशाचे सगळी महत्वाची शहरे रशियन आर्मीने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यावर हल्ला चढवला होता.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
russia ukrein war

russia ukrein war

गेल्या दहा दिवसापासून रशियाने युक्रेन वर आक्रमण करून मोठा विध्वंस  घडवून आणला होता.युक्रेन आदेशाचे सगळी महत्वाची शहरे रशियन आर्मीने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यावर हल्ला चढवला होता.

परंतु रशियन सरकारने नागरिकांचे होत असलेले हाल पाहून तात्पुरती युद्ध बंदीची घोषणा केली आहे. रशियाने यूक्रेन वर आक्रमण करण्याचा आजचा दहावा दिवस होता परंतु या दहा दिवसात जवळजवळ दहा लाख नागरिकांनी यूक्रेन बाहेर स्थलांतर केले आहे. आजपर्यंत सगळ्यात मोठे व वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होते. त्यानंतर आज दहाव्या दिवशी रशियाच्या बाजूने मोठा निर्णय जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देण्यासाठी रशियाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दोघी उभय देशांमध्ये वाटाघाटींसाठी दोन फेऱ्या चर्चा झाल्या. परंतु या मदत कुठल्याही प्रकारचा समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर आता हा रशियाच्या बाजूने मोठा निर्णय आला आहे. तात्पुरते युद्ध थांबवण्याचा निर्णय रशिया कडून घेतला गेला आहे.त्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती जैसे थे अशीच राहील.

रशियन सैन्य माघार घेण्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही मात्र सध्या तात्काळ युद्ध बंद करण्याचा निर्णय रशियाने  जाहीर केला. नागरिकांचे होणारे हाल पाहून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

English Summary: russia ukrein war shut ceasefire declare from russia goverment Published on: 05 March 2022, 01:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters