सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. यामुळे यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. या दोन्ही देशावर याचा मोठा परिणाम होत आहे. असे असताना आता याचा परिणाम इतर देशांवर देखील जाणवू लागला आहे. आता भारतात यामुळे मोठी महागाई वाढू लागली आहे. यामुळे याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक बजेटवर होणार आहे. याचे कारण म्हणजे देशात एकाच दिवसात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता हळूहळू हे भाव वाढणार आहेत. या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारला 1 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये आता सोयाबीन तेल 150 रु प्रती किलो वरून 163 रुपयांवर गेले आहे. पामतेल 145 रु प्रति किलोवरून 155 रुपयांवर गेले आहे. तसेच सूर्यफूल तेल 160 रु प्रती किलोवरून 170 रुपयांवर गेले आहे. तसेच शेंगदाणा तेल 170 रु प्रती किलोवरून 177 रुपयांवर गेले आहे. यामुळे सध्या सर्वसामान्य लोकांना याची झळ बसत आहे, तसेच येणाऱ्या काळात या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीयांना देखील भोगवा लागत आहे.
यामुळे युद्धाची झळ थेट स्वयंपाक घराला बसणार आहे. काही ठिकाणी तेलांची साठेबाजी देखील सुरू आहे. सुर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. याबाबात एसबीआयचा आर्थिक संशोधन विभागाचा एक अहवाल समोर आला आहे. मागील चार महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या भावात अचानक दोनच दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
भारतात जवळपास 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केले जाते. पण युद्धामुळे या आवकेवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर काही भागात तेलाची साठेबाजी झाल्यामुळेही खाद्यतेलाचे भाव अचानक वाढले असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशात शांतता प्रस्थिपित होण्याची प्रार्थना अनेकजण करत आहेत. यामुळे पुढील काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments