रशियामधून जवळपास ६.२३ किलो मेट्रिक टन म्हणजेच ६.२३ लाख लिटर सूर्यफूल खाद्यतेल भारताकडे जहाजद्वारे रवाना झालेले आहे. जे की काल रात्री हे जहाज सीरिया देशात पोहचले आहे. पुढील आठ दिवसात खाद्यतेलाचे आलेले जहाज नवीन मुंबई च्या जेएनपीटी या बंदरावर पोहचेल अशी अपेक्षा आहे. फक्त एवढेच नाही तर पहिल्या टप्यात ६.२३ किलो मेट्रिक टन खाद्यतेल आले आहे तर पुढच्या टप्याटप्यात रशियाकडून अजून सात जहाजे याच क्षमतेची लवकरच भारताकडे रवाना होणार आहेत. जे की युद्धामुळे तेलाचा साठा व्यापारी करत होते आणि आयात निर्यात बंद असल्याने दर वाढू लागले होते जे की आता तेलाचे दर जे भडकले होते ते कमी होतील अशी शक्यता आहे.
भारत देशात सर्वात जास्त खाद्यतेलाचा वापर :-
भारत देशात सर्वात जास्त खाद्यतेलाचा वापर केला जातो. भारत देशाला देशांतर्गत मागणीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के तेल आयात करावे लागते. त्यामध्ये २२ टक्के सुर्यफुल तेल असते जे की हे सूर्यफूल तेल भारताला युक्रेन तसेच रशियाकडून येते. हे सर्व तेल जहाजद्वारे काळ्या समुद्रामध्ये आणले जाते. मात्र रशिया १५ फेब्रुवारी पासून काळ्या समुद्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे जे की १५ फेब्रुवारी नंतर समुद्रातून एक ही जहाज भारताकडे रवाना झाले नाही. त्यानंतर युद्ध च सुरू झाले जे की अजून आयातीबाबत अनिश्चितता झाली होती. खाद्यतेलाची आयात होत नसल्यामुळे भारतात तेलाचे दर वाढू लागले. पण आता एक जहाज रशियातून भारताकडे रवाना झाले आहे त्यामुळे ही परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी शक्यता आहे.
बुधवारी रात्री ३० टक्के जहाजद्वारे अंतर कापले :-
६.२३ लाख लिटर सूर्यफूल खाद्यतेल क्षमतेचे असलेले जहाज भारताकडे रशियामधून रवाना झाले आहे. बुधवारी रात्री म्हणजेच काल रात्री जहाजाने ३० टक्के अंतर कापले आहे. ६.२३ लाख लिटरचा जो साठा आहे तो भारतासाठी आठ ते दहा दिवसांसाठी मुबलक आहे. जे की भारतामध्ये जी खाद्यतेलाची होणारी टंचाई आहे ती या खाद्यतेलाच्या आधारामुळे दूर होईल तसेच मागील आठ दिवसात जे तेलाचे दर वाढले आहेत ते दर सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना पण कमी होतील असे अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी म्हणले आहे.
मोदी-पुतिन यांची चर्चा झाल्यानंतर :-
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी खाद्यतेलाबाबत चर्चा केली होती त्यामध्ये खाद्यतेलाची निर्यात सुरू करावी असे मोदींनी सांगितले होते. तसेच केंद्रीय वाणिज्य व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सुद्धा रशियासोबत राजनैतिक चर्चा केली. 'एमव्ही व्होल्गा रिव्हर' नावाचे हे जहाज रशियामध्ये असलेल्या काळ्या समुद्रातील कावकाझ या बंदरावुन निघाले आहे. १५ ते १७ मार्च दरम्यान नवी मुंबई मधील जेएनपिटीत बंदरवर हे जहाज दाखल होणार आहे अंदाज वर्तविला आहे. पुढील टप्याटप्यात याच क्षमतेची अजून सात जहाजे भारताच्या दिशेने रवाना होणार असल्याने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा भेटणार आहे.
Share your comments