1. बातम्या

आता 'डीएपी'बद्दल नो टेन्शन,रशिया बनला सर्वात मोठा खतपुरवठादार

खतांची टंचाई ही समस्या प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी राहते. जेव्हा पिकांना रासायनिक खते देण्याची गरज असते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई भासते. यामागे कृत्रिम टंचाई देखील असू शकते किंवा अपूर्ण पुरवठा हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
russia maintain supply to diamonium phosphate to india

russia maintain supply to diamonium phosphate to india

खतांची टंचाई ही समस्या प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी राहते. जेव्हा पिकांना रासायनिक खते देण्याची गरज असते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई भासते. यामागे कृत्रिम टंचाई देखील असू शकते किंवा अपूर्ण पुरवठा हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे.

. खतांचा तुटवडा भारतामध्ये यावर्षी देखील असताना भारताने  रशियाकडून साडेतीन लाख टन डीएपी आयात केले असून एप्रिल ते जुलै या कालावधीदरम्यान डीएपीचा पुरवठा पूर्ण होईल.

डीएपी खताची आयात इंडियन पोटॅश लिमिटेड,राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अर्थात आरसीएफ,  चंबळ फर्टिलायझर्स आणि कृषक भारती को-ऑपरेटिव यांनी $920-925 प्रतिटन खर्च अधिक वाहतूक या दराने करार केला होता.

डीएपी च्या खरेदीसाठी भारताने दिलेली ही रक्कम इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. परंतु या आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जर इतर देशांचा विचार केला तर इंडोनेशिया ने 25 हजार ते 26 हजार टनासाठी $992 प्रति टन अधिक वाहतूक या दराने निर्यातीसाठी पैसे दिले आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनी शेतीत या खतांचा वापर केला तरच शेतीची उत्पादकता वाढेल

 भारत हा डीएपी चा सर्वात मोठा ग्राहक

यामुळे इतर पुरवठादाराने वर दबाव येण्याची शक्यता आहे.विशेषतः मोरक्कोचा ओसिपी समूह, चीनचा वाय यू सी, सौदी अरेबियाचा Madeen SABIC. बाजारातील हिस्सा राखण्यासाठी त्यांना किमती कमी करावे लागतील.

पुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणणे ही एक स्मार्ट रणनीती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याअंतर्गत अमेरिकेतून प्रथमच 47 हजार टन युरिया आयात केला आहे.

त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय किमतीवर सूट देण्यासाठी रशियाकडून डीएपी खरेदी करणे देखील या धोरणाचाच एक भाग आहे. भारत हा डीएपी वापरणारा एक मोठा ग्राहक देश आहे.

नक्की वाचा:नक्की वाचा:कांदा उत्पादकांना दिलासा! 2 जुलैपासून बांगलादेशला होणार कांद्याची निर्यात, कांदा भावात मिळेल दिलासा

 जुलैपर्यंत होणार इतके टन खतांचा पुरवठा

एप्रिल ते जुलै या कालावधीत 9.5-9.8 लाख टन डीएपी चा  पुरवठा होईल असा अंदाज आहे यापैकी साडेतीन लाख टन फॉस ऍग्रो द्वारे पुरवठा केला जाईल.

ज्यामध्ये मॅक्सडेन आणि SABIC 2.8 लाख टन, चीनच्या वायपीयूसीचा वाटा 1.27 लाख टन आणि OCP 1.03 लाख टन पुरवठा करेल. भारताने 2021-2022( एप्रिल ते मार्च) या कालावधीत $4007.50 दशलक्ष किमतीचे 58.60 लाख टन डीएपी आयात केले.

नक्की वाचा:कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; 'या' देशाने भारतीय कांदा आयत करण्यासाठी दिली परवानगी

English Summary: russia maintain supply to diamonium phosphate to india so not deficiency to dap in india Published on: 30 June 2022, 04:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters