1. बातम्या

ऋण समाधान योजना: ३१ जानेवारीच्या अगोदर अर्ज भरल्यास ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ऋण समाधान योजना

ऋण समाधान योजना

एसबीआयच्या ऋण समाधान योजनेनुसार ३१ जानेवारी २०२१ च्या अगोदर कर्ज भरणाऱ्यासाठी ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जात आहे. आता जुने कर्जदार १० टक्के कर्ज भरून कर्जमुक्त होऊ शकतात. मिडियामध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार एसबीआय पाटणचे मॅनेजर जयपाल सुंडी तसेच फिल्ड ऑफिसर अनुप कुमार यांनी बँक डिफॉल्टर यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले की, ३१ जानेवारी २०२१ पर्यंत बँकेच्या ओटीएस योजनेचा लाभ घेऊन कर्ज भरू शकतात. या योजनेनुसार १० टक्के रक्कम भरून बँकेचे असलेल्या कर्जपासून मुक्त होऊ शकतो.

 

हेही वाचा :'या' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये ? काय आहे ही योजना वाचा सविस्तर

कोणत्या प्रकारच्या कर्जावर मिळेल या योजनेचा फायदा?

   आवास लोन सोडून इतर योजनांच्या अंतर्गत येणारे कृषी, व्यवसाय इत्यादींना या योजनेचा लाभ मिळेल. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल. बँक डिफॉल्टर अर्जासोबत एकूण रक्कम आणि त्याच्या १० टक्के रक्कम भरून या माफी योजनेचा फायदा घेऊ शकतात. डिफॉल्टर आपल्या बँकेचे संपर्क साधून आपल्या खात्यात संबंधित माहिती देऊ शकतात.

 

कृषी लोन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त फायदा

 मॅनेजर आणि फिल्ड ऑफिसर पाटण शाखा यांच्यानुसार दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम कृषी लोन खात्याशी संबंधित सहाशे शेतकरी आहेत. त्यांना याचा भरपूर प्रमाणात फायदा होईल अशा डिफॉल्टर यांना नोटीस देऊन ओटीएस योजनेविषयी माहिती दिली जात आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत जर संबंधित योजनेचा फायदा घेतला नाही तर नंतर पूर्ण रक्कम भरावी लागेल, अन नाही भरली तर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते.

 

या योजनेसाठी पात्रता

 भारतीय स्टेट बँक चे सहाय्यक प्रबंधक श्रीनिवासन प्रसादराव यांच्यानुसार जे कर्ज खाते ३१ डिसेंबर २०२१  व त्यापूर्वी एनपीए मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे तसेच त्यांचे एकूण लोन २० लाख रुपयांपर्यंत असेल असे खातेदार या योजनेसाठी पात्र आहे. असलेल्या रकमेमध्ये पात्रतेच्या आधारे पंधरा ते ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट योजनेच्या अटी आणि शर्ती नुसार दिले जाईल. जर लवकर पैसे भरले तर ५ ते १५ टक्‍क्‍यांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जाईल. या योजनेमध्ये १० टक्के रक्कम भरून खाते बंद केले जाऊ शकते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters