1. बातम्या

रुची सोया कंपनीच्या शेअर्समध्ये नऊ हजार टक्क्यांची वाढ

पुणे : शेअर बाजाराच्या इतिसाहसाकडे पाहिल्यास कदाचित अशा ठराविक घटना दिसतील ज्या आपल्याला आवक करणाऱ्या ठरतात. शेतीच्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या रुची सोया या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या सहा महिन्यात नऊ हजार टक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

KJ Staff
KJ Staff

पुणे  : शेअर बाजाराच्या इतिसाहसाकडे पाहिल्यास कदाचित अशा ठराविक घटना दिसतील ज्या आपल्याला  आवक करणाऱ्या ठरतात. शेतीच्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या रुची सोया या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या सहा महिन्यात नऊ हजार टक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारीत या शेअरची किंमत केवळ १७ रुपये होती. २९ जूनला या शेअरची किंमत १५३५ इतकी झाली.

खाद्यतेल क्षेत्रातील या कंपनीला मागच्या वर्षी रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीने विकत घेतले. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये खूप जास्त वाढ झाली. रुची सोया ही खाद्यतेल निर्मितीतील मोठी कंपनी आहे. जेव्हा या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा रामदेवबाबा यांच्या पतंजलीने ही कंपनी विकत घेतली. परंतु मागच्या काही दिवसात हा शेअर थोड्या प्रमाणात पडला असून तो सध्या ७४० च्या आसपास आहे. परंतु देशातील खाद्यतेलाची मागणी लक्षात घेता आणि पतंजली हा ब्रँड लक्षात घेता हा शेअर भविष्यात पुन्हा वाढू शकतो.

English Summary: Ruchi Soya Company shares rise 9,000 per cent Published on: 23 July 2020, 09:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters