जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यामध्ये राजू शेट्टी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही ठराव आणि मागण्या करण्यात आल्या.
तसेच गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक 200 रूपये तातडीने देण्यात यावेत. महसुली विभाग सूत्राप्रमाणे 2020-21, 2021-22 या गळीत हंगामातील साखर कारखान्यांचा आरएसएफप्रमाणे निघणाऱ्या दराची घोषणा करावी. चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिक 350 रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी.
भूमिअधिग्रहण कायद्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेली दुरूस्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी. तसेच लम्पी सारख्या आजारामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आलेले आहे. यामुळे केंद्र सरकारने बंद केलेला पशुधन विमा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावा. ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन ४.५ टके एवढी तोडणी घट करण्यात आलेली आहे. ती रद्द करून १.५ टक्के करण्यात यावी.
आता जमीन खरेदीसाठी सरकार देणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या सविस्तर..
केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 35 रूपये करण्यात यावा. शेतीपंपाला विनाकपात दिवसा 12 तास बीज देण्यात यावे. तसेच प्रलंबित बीज पंपाचे कनेक्शन ताबडतोब देणेत यावे. महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक क्षेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील बेकायदेशीर दुरूस्ती शिंदे फडणवीस सरकारने तातडीने रद्द करावा.
आज स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी काय घोषणा करणार? ऊस उत्पादकांचे लागले लक्ष
दरम्यान, यंदाची ही २१ वी ऊस परिषद होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही परिषद राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही ठराव आणि मागण्या करण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या;
देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, मोदींच्या हस्ते लोकार्पण..
बातमी कामाची! लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना ३० हजारांपर्यंतची मदत
पावसामुळे टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा...
Share your comments