1. बातम्या

हळदीच्या निर्यातीत ३०० टक्क्यांची वाढ

भारतातून निर्यात होणाऱ्या हळदीला युरोप आणि पश्चिम आशियातील देशात मागणी वाढली आहे. भारतीय हळदीचे औषधी गुण आपल्याला माहित आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोक परत हळदीच्या औषधी गुणाकडे वळल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

KJ Staff
KJ Staff


भारतातून निर्यात होणाऱ्या हळदीला युरोप आणि पश्चिम आशियातील देशा मागणी वाढली आहे.  भारतीय हळदीचे औषधी गुण आपल्याला माहित आहेत. आता कोरोना व्हायरसमुळे लोक परत हळदीच्या औषधी गुणाकडे वळल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मांसाहार खाल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी भीती नागरिकांमध्ये पसरल्यामुळे चिकनचे दर कोसळले आहेत. याच दरम्यान देशातील बाजारात भाज्या आणि फळांची विक्री वाढली आहे.

केबी एक्सपोर्टचे संचालक कौशल खाखर यांनी एका वृत्त संस्थेला माहिती दिली आहे. खाखर यांच्या मते, जर्मनीत हळदीची मागणी वाढली आहे. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये हळदीची उत्पन्न येत असते. फळे आणि भाज्यांची एकूण मागणी १५ टक्क्यांनी वाढली आहे.  परंतु कच्च्या हळदीची मागणी ३०० टक्क्यांनी वाढली आहे.  परंतु परदेशातील विमान सेवा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फायदा घेणे अवघड असल्याचे निर्यातकांनी सांगितले.  मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, ते दररोज ३ ते ४ टन हळदीची निर्यात करतात. गेल्या दहा दिवसांपासून हळदीची मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले.  फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी साधरण ३०० किलो हळदीची निर्यात केली जात होती. मार्चपासून निर्यातीत वृद्धी आली आहे, असे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

English Summary: row turmeric export increased by 300 percent Published on: 18 March 2020, 12:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters