Rohit Pawar News : मागील काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीत २०० पैकी २१४ गुण विद्यार्थ्यांना दिल्याचे समोर आले आहे. यावरुन वादंग सुरु असतानाचा आता पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सारथी, बार्टी, महाज्योतीतर्फे आयोजित परिक्षेत गोंधळ निर्माण झालाय. हे प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाना साधला आहे.
रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे
"तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पीएचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचाही पेपर फुटला. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटी वर कडक कायदा करा अशी मागणी युवांनी आणखी किती वेळा करायची? युवांना सिरियस होण्याचा सल्ला देत असताना आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरीयस होणार की नाही?", असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा पेपर २०० गुणांचा असून एका विद्यार्थ्याला २१४ गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आल्याने सरकार विरोधात टीकेची झोड उठली आहे. त्यात आता पुन्हा हे प्रकरण नवीन समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे.
दरम्यान, तलाठी पेपरबाबत टीका झाल्यानंतर महसूल विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी महसूल विभागाने सांगितले की, संबंधित विद्यार्थाला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
Share your comments