1. बातम्या

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

राज्य शासनाने कोस्टल महामार्गावरील ९ खाडी पुलांचे काम सुरू केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे  काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Deputy Chief Minister Eknath Shinde News

Deputy Chief Minister Eknath Shinde News

रायगड : नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध कोकणाचा जलदगतीने विकास व्हावा यासाठी रस्ते महामार्ग उभारून प्रवासाचा वेग कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहॆ. प्रवासाचा वेग कमी करण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणे, मुंबई सिंधुदुर्ग अॅक्सेस कंट्रोल रस्ता बरोबरच अनेक रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कुल माणगाव च्या नवीन इमारतीचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होतेव्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे, संचालक अनिकेत तटकरे यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोकणातील विकासाला गती देण्यासाठी येथील प्रवासाचा कालावधी कमी करण्याची गरज आहॆ. यासाठी राज्य शासनाने कोस्टल महामार्गावरील खाडी पुलांचे काम सुरू केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे  काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुंबई गोवा महामार्ग वर माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माणगाव बायपासचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. कोकणातील लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रकल्प या ठिकाणी उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन अनेक लोकांभिमुख प्रकल्प राबवून विकासाला चालना देत असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत महिला सक्षमकरणासाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना किती ही अडचणी आल्या तरी बंद करण्यात येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली

English Summary: Roads and highways will be built for rapid development of Konkan Information from Deputy Chief Minister Eknath Shinde Published on: 11 June 2025, 11:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters