मुंबई: राज्यातील नदीजोड प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी दूर करुन या प्रकल्पांना चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नदीजोड प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
राज्य शासनामार्फत दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी दीर्घकालीन मुदतीकरिता कमीत कमी व्याजदराने निधी उभारुन प्रकल्प राबविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.याव्यतिरिक्त विपुल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच या योजनांतील धरणांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, प्रकल्प सचिव सं. कृ. घाणेकर, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Share your comments