1. बातम्या

राज्यातील तापमानात वाढ ; तर देशातील इतर भागात पावसाची शक्यता

विदर्भ, मराठावाडा, खानदेशात सुर्य कोपला आहे. विदर्भात तापमान अधिक असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

KJ Staff
KJ Staff


विदर्भ, मराठावाडा, खानदेशात सुर्य कोपला आहे. विदर्भात तापमान अधिक असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  राज्याच्या अनेक भागात पावासाने हजेरी लावली.  यामुळे दुपारपर्यंत ऊन आणि त्यानंतर पावसाचा अनुभव नागरिकांना येत आहे.

दरम्यान देशातील इतर राज्यात मात्र पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासात साधारण १० राज्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानच्या काही भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, पुर्वोत्तर भारत, तामिळनाडूनमधील काही भाग, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशात हलक्या प्रतीचा पाऊस पडणार आहे. मागील २४ तासात जम्मू कश्मीर, हिमाचल लद्दाख, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा वाढलेला दिसला.

सोमावारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील तापमान
पुणे ३९.३, जळगाव ४३.३, धुळे ४२.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.९, निफाड ३९.०, सांगली ४०.०, सोलापूर ४२.९, डाहाणू ३३.८, सांताक्रुझ ३४.०, रत्नागिरी ३५.२, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.७, नांदेड ४३.५, अकोला ४४.९, अमरावती ४३०८, बुलडाणा ४१.४, बह्मपुरी ४४.९, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.९, नागपूर ४४.२, वर्धा ४४.२.

English Summary: Rising temperatures in the state; while the possibility of rains in other parts of the country Published on: 05 May 2020, 12:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters