MFOI Update : शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या हितासाठी कृषी जागरणची स्थापना २७ वर्षांपूर्वी करण्यात आली. जो आज या क्षेत्रात आपले मासिक, वेबसाईट आणि इतर माध्यमातून काम करून इतिहास रचत आहे. कृषी जागरण माध्यमाचा विशेष कार्यक्रम म्हणजे ‘केजे चौपाल’. ज्यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर आणि प्रगतीशील शेतकरी पाहुणे म्हणून येतात आणि त्यांचं काम, अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान शेअर करतात. आज (दि.२०) रोजी देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी डॅा.राजाराम त्रिपाठी पहिल्यांदा केजे चौपाल कार्यक्रमात आले होते.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील राजाराम त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात. औषधी शेती आणि आपल्या मेहनतीची जोड या माध्यमांतून ते कोट्यावधींची उलाढाल करतात. नुकताच मागील वर्षी दिल्लीत पार पडलेल्या कृषी जागरण आयोजित मिलीनीयर फार्मर ऑफ इंडिया अवॅार्ड २०२३ प्रायोजक बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स मधील भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून राजाराम त्रिपाठी यांना सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या हस्ते त्रिपाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच कृषी जागरणच्या दिल्ली मुख्यालयाला राजाराम त्रिपाठी यांनी भेट दिली आणि संपूर्ण टीमशी संवाद साधला.
यावेळी कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी.डॉमिनिक यांनी राजाराम त्रिपाठी यांचे स्वागत केले. आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन केले. २७ वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले म्हणत भारतातील पहिला सर्वात श्रीमंत शेतकरी राजाराम त्रिपाठी यांना म्हटले जाईल, असंही डॉमिनिक म्हटले.
यावेळी राजाराम त्रिपाठी म्हणाले की, शेती ही काळाची गरज असणार आहे. कोरोना काळात शेतीची किंमत सर्वांना समजली आहे. देशात ५४ करोड बेरोजगार त्या सर्वांनी आता शेतीकडे वळले पाहिजे. या मुद्यावर प्रकाश टाकला. त्यावेळी त्यांनी कृषी जागरणच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक देखील केले.
पुढं ते म्हणाले की, मी अतिशय दुर्गम भागातून इथपर्यंत आलो आहे. जर मी इथपर्यंत पोहोचून जर हा अवॅार्ड प्राप्त करू शकत असलो तर तुम्ही समजू शकता की कृषी क्षेत्रात शेतकरी किती पुढे जाऊ शकतो. त्यासोबत तुम्ही कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी काम करता ही अभिमानाची बाब आहे, असं म्हणत त्यांनी कृषी जागरण टीमचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला मिलिनेयर फार्मर ऑफ इंडिया अवॅार्ड २०२३ हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी भविष्यात प्रेरणादायक ठरला अस देखील ते म्हणाले.
याचदरम्यान मोदी सरकार लवकरच देशातील श्रीमंत शेतकऱ्यांकडून टॅक्स घेण्याची हालचाल करत आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी यावर चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, प्रत्येक शेतकरी शेती वस्तुवर जीएसटीच्या माध्यमातून कर देत आहे. त्यात ट्रॅक्टर खरेदी असो, खत खरेदी, डिझेल-पेट्रोल या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी कर देत आहे. तसंच सरकारने आता कर लावला तर शेतीत येणारी बेरोजगार पिढी बेरोजगारच राहिलं. कर लावावा पण आधी शेतकऱ्यांना श्रीमंत बनू द्या मग कर लावावा, असं त्रिपाठी म्हणाले.
Share your comments