1. बातम्या

देशात तांदळाचे उत्पन्न होणार मुबलक; धान लागवडीच्या क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ


पुणे : यंदा देशभरात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड चांगली झाली आहे. देशात भाताच्या धानाची लागवड ३९० लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. या वर्षाच्या हंगामात तांदळाचे उत्पादन मुबलक होऊन दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाताचे मुबलक उत्पादन झाल्यास भावात घट होण्याची शक्यता मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केली. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर देशभरातील भात उत्पादक शेतकरी लागवडीस सुरुवात करतात. लागवड झाल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत भाताचे पीक हाती येते. भाताच्या लागवडीस कमी कालावधी लागतो. त्यामुळे देशभरातील शेतकरी भात लागवडीला प्राधान्य देतात. दरम्यान भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदाच्या हंगामात सुद्धा देशात भाताची लागवड विक्रमी झाल्याचे राजेश शहा यांनी सांगितले.

गेल्या वर्षी देशभरात भाताची लागवड ३५४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. त्यातून तांदळाचे उत्पादन ११ लाख ७५ हजार टन एवढे मिळाले होते. गेल्या वर्षीचे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या हंगामात संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भात धान लागवडीचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. लागवड वाढल्यानंतर साहजिकच सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात घट होईल, असे त्यांनी नमूद केले. उत्तरेकडील राज्यांत अधिक उत्पादन होणार असल्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत भाताची विशेषत: बासमतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बासमती तांदळाची निर्यात संपूर्ण जगभरात करण्यात येते. देशातील अन्य राज्यात भाताची लागवड केली जाते. मात्र, उत्तरेकडील राज्यात मोठे उत्पादन घेतले जाते.

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा, नाशिक परिसर, कोल्हापूर तसेच कोकणपट्टीत भाताची लागवड केली जाते. मात्र, उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भात लागवडीचे प्रमाण कमी आहे. दरम्यान २०१७-१८ या वर्षात भात लागवड क्षेत्र हे ३६८ लाख हेक्टर होते. तर तांदूळ उत्पादन ११.२५ लाख टन होते. २०१८-१९ या वर्षातील लागवड क्षेत्र ३७२ हेक्टर होते तर उत्पन्न ११.६५ लाख टन होते. २०१९ -२० या वर्षाच्या दरम्यान ३५४ लाख हेक्टर लागवड होती. तर ११.५५ लाखठ टन इतके उत्पन्न होते. साल २०२००२१ मध्ये साधरण ३९० लाक हेक्टर लागवड होती. तर १२ लाख टन इतके उत्पादन होते.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters