कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशके, औजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट पुढील एक वर्षात दुप्पट करण्यात यावे, असे निर्देश आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत. यावेळी कृषी अधिकारी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)ची आढावा बैठक यावेळी पार पडली. लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक व स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
टोमॅटोच्या शेतात शेतकऱ्याने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून लढवली शक्कल..
स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत नियोजन करण्याच्या तसेच विदर्भ-मराठवाड्यातील प्रमुख पिकांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत दिल्या.
शेतकऱ्यांनो या पद्धतींनी शेतातील भूजल पातळी सुधारू शकते, जाणून घ्या..
याबाबत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या बोगस बियाण्याची देखील सगळीकडे तक्रार आहे. यावर देखील मंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आधीच सांगितले आहे.
इथल्या दूधाला भाव देत नाही अन् बाहेरुन आयात का करता ? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर बरसल्या...
Share your comments