1. बातम्या

डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होण्‍याकरिता संशोधन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते, कार्यशाळेचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पार पडला.

KJ Staff
KJ Staff


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते, कार्यशाळेचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पार पडला. व्‍यासपीठावर सिंगापुर येथील जागतिक विद्यापीठाचे डॉ. दिपक वाईकर, सुरत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजय देशमुख, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे डॉ. सुरेश ओहोळ, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्‍याकडुन मिळालेल्‍या प्रतिसादाचे कौतुक करून विद्यार्थ्‍यांनी, संशोधकांनी तसेच प्राध्‍यापकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होण्‍याकरिता संशोधन करण्‍याचे आवाहन केले.

प्रास्‍ताविकात प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे यांनी कार्यशाळेत यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्रासह डिजिटल तंत्रज्ञान, स्‍मार्टफोन, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, कॅडकॅम तंत्रज्ञान आदी विषयावर प्रात्‍याक्षिकासह विविध क्षेत्रातील तज्ञांनी माहिती दिल्‍याचे सांगितले. यावेळी कार्यशाळात सहभागी विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी निल्‍सा, आशुतोष पाटील, भक्‍ती देशमुख, आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून या सारखे प्रशिक्षण वर्गाचे वारंवार आयोजन करण्‍यात यावे अशी विनंती केली.

कार्यशाळेत इचलकरंजी येथील न्‍युजेनीक्‍स इन्फोटीक्‍सचे आदित्‍य मराठे, पुणे येथील नेल इन्‍फोटेकचे शितल जाधव, पुणे येथील एसएप एग्रीटेकचे अजित खरजुले यांनी प्रशिक्षणार्थ्‍यींना रोबोटीक्‍स, मानवाशी संवाद साधणाऱ्या चॅटबॉटचे व पिकावर फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्‍यक्षिक दाखवले तसेच डिजिटल यंत्र निर्मिती करणारे संभाजी शिराळे, सलीम पठाण, कुशल ग्रामीण उद्योजकांनी सोलार फवारणी यंत्र, झाडावरील फळे तोडणारा रोबोट व पवनचक्‍कीव्‍दारे उर्जा निर्मितीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले.

कार्यशाळा यशस्‍वीतेकरिता डॉ. भगवान आसेवार, डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, प्रा. संजय पवार, डॉ. प्रविण वैद्य, प्रा. दत्‍तात्रय पाटील, प्रा. भारत आगरकर, डॉ. शाम गरूड, डॉ. विनोद शिंदे आदीसह प्रकल्‍पातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वीणा भालेराव तर आभार डॉ. कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यशाळेत विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यांनी व प्राध्‍यापकांनी सहभाग नोंदविला. 

English Summary: Research to get the most out of digital technology for farmers in Marathwada Published on: 18 March 2020, 08:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters