1. बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त बीकेटी टायर्सची ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने भारताच्या शेतकरी आणि जवानांना मानवंदना

भारत, 21 जानेवारी, 2023- ऑफ-हायवे टायर क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड, (बीकेटी) या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे प्रेरणादायी गीत प्रसिद्ध केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे शेतकरी आणि आपल्या राष्ट्राचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या भारतीय जवानांना समर्पित असे हे गीत आहे. जे जस्ट म्युझिकने शेतकरी आणि सैनिकांच्या अतुलनीय योगदानाला सलाम करणारे ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे गीत तयार केले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Republic Day, BKT Tires salutes farmers

Republic Day, BKT Tires salutes farmers

भारत, 21 जानेवारी, 2023- ऑफ-हायवे टायर क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड, (बीकेटी) या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे प्रेरणादायी गीत प्रसिद्ध केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे शेतकरी आणि आपल्या राष्ट्राचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या भारतीय जवानांना समर्पित असे हे गीत आहे. जे जस्ट म्युझिकने शेतकरी आणि सैनिकांच्या अतुलनीय योगदानाला सलाम करणारे ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे गीत तयार केले आहे.

आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्यांपासून ते आपल्या जमिनीची लागवड करणाऱ्यांपर्यंत, ज्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा प्रत्येकाला 'मुस्कुरायेगा इंडिया' या गीताद्वारे, बीकेटीने मानवंदना दिली आहे. या प्रजासत्ताक दिनी आम्हाला काहीतरी विशेष करायचे आहे आणि आमच्या देशाच्या खऱ्या नायकांचा - शेतकरी आणि सैनिकांचा सन्मान करण्याची इच्छा आहे.

'मुस्कुरायेगा इंडिया' ही आमच्या संपूर्ण कंपनीकडून आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या व्यक्तींना मानवंदना आहे. ते आपल्या राष्ट्रामध्ये एकता निर्माण करण्यात अविभाज्य भूमिका निभावतात आणि विविधतेला सर्वात अनोख्या पद्धतीने साजरे करतात,” असे बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार, म्हणाले. ते पुढे म्हणाले, या वीरांचे कठोर परिश्रम, आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी देशवासियांना आमच्यासोबत सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

काळ्या टोमॅटोची लागवड करून देशातील शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या फायदे...

शेतकरी बांधव अविरत कष्ट करुन जमिन पिकवतात, त्यामुळे आपण सुखाचे दोन घास खाऊ शकतो. तर आपले जवान डोळ्य़ांत तेल टाकुन आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात, त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरावर छापे, जगभरात उडाली खळबळ..

या दोघांमुळे आपले जीवन सुसह्य आहे. या दोघांच्या त्यागाला आणि कष्टाला मुस्कुरायेगा इंडिया या गीताद्वारे बीकेटी परिवार मानवंदना देत आहे. देशबांधवांनी देखील यात सामील व्हावे असे आवाहन बीकेटी परिवाराने केले आहे.

गीत अनुभवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.facebook.com/BKTTiresIN/videos/1196121124444910

महत्वाच्या बातम्या;
माती परीक्षण म्हणजे शेतीची गुरूकिल्ली
गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप
HDFC बँक आज विरुधुनगर, तमिळनाडू येथे आपली 'बँक ऑन व्हील्स' व्हॅन करणार सादर

English Summary: Republic Day, BKT Tires salutes farmers soldiers India inspiring song (1) Published on: 25 January 2023, 02:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters