राज्यात अतिपाऊस झाला असल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठावाडा आणि विदर्भातही यावर्षी जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेली पिके खराब होत आहेत. दरम्यान राज्य शासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत. वाशीमच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माहिती लवकर देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल त्यांना शासन भरपाई मिळणार आहे.
शेतात काढून ठेवलेले सोयाबीन पाऊसाने भिजले असेल आणि तुम्ही त्याचा विमा काढला असेल तर तुम्हाला भरपाई करून मिळणार आहे, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे. पण यासाठी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितलं. वाशीम जिल्ह्यातील सोयाबीन शेतकरी काढणीची कामे करत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसाच ठेवला आहे. पण गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सोयाबीन भिजले आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले असेल अशा शेतकऱ्यांनी जर विमा उतरवला असेल त्यांचे नुकसान झाले असेल. त्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई या सदराखाली पीक विमा मिळू शकतो, जिल्हा कृषी अधिकारी म्हणाले आहेत.
पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्राखाली येणाऱ्या शेतात जर सोयाबीन वाळवण्यासाठी ठेवला असता याच दरम्यान १४ दिवसाच्या आत जर पाऊस, आकस्मित गारपीट,चक्रीवादळामुळे जर हा सोयाबीन खराब झाले असतील. तर वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाईस ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वीमा कंपनीला व कृषी विभागाला ७२ तासाच्या आत पुरवणे बंधनकारक आहे. यासाठी सर्वे नंबर खूप महत्वाचा आहे तसेच यासोबत नुकसानग्रस्त जागेचा तपशील देणे फार महत्वाचे आहे. मिळालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल.
यामध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी याचा समावेश असेल. पाहणीनंतर १० दिवसाच्या आत हा अहवाल सादर करण्यात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असेल, अशांनी गूगल प्लेस्टोर CORP INSURANCE हे एप डाऊनलोड करून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. किंवा १८००१०२४०८८ / १८००३००४०८८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा rgcil.pmfby@relinceada.com या मेलवर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करुन कळवावे. संबंधित कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा संबंधित काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. ८२००१६०६२५, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाही शंकर तोटावार यांनी दिली आहे.
Share your comments