1. बातम्या

कायद्यातील त्रुटी दूर करा; आंधळेपणाने कायद्याला नाही मिळणार समर्थन : मुख्यमंत्री

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापले आहे. पण राज्यात तीन पक्षाचे सहभाग असलेले महाविकास आघाडी सरकारमध्ये अजून एक निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापले आहे. पण राज्यात तीन पक्षाचे सहभाग असलेले महाविकास आघाडी सरकारमध्ये अजून एक निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना आपण आंधळेपणाने समर्थन देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या कायद्यामधील  त्रुटी, उणीव दूर करणे गरजचे आहे, अशी भुमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मांडली.  केंद्र सरकारच्या या कायद्यांवर विचारविनिमय करुन धोरण निश्चित करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी  बैठक सह्याद्री अतितीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली ही भुमिका मांडली. या बैठकीस अनेक शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते. शेतकरी हितासाठी  आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरीही एकत्र आलोह पाहिजे अशी आमची भुमिका आहे. हे कायदे  करण्यापुर्वी  सर्वांना विश्वासात घेऊन तसेच किमान शेतकऱ्यांच्या संघटनांसमवेत अगोदर चर्चा होणे गरजेचे होते.

विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही, पण शेतकऱ्यांसबंधातील यापुर्वीच्या विविध कायद्यांच्या  अंमलबावणीसंदर्भातील अनुभवांची देवाणघेवाण  होणे गरजेचे होते. शेतकरी संघनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करुन आराखडा तयार करुन राज्यात कायद्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  दरम्यान या बैठकीस  उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, दादा भुसे आदी नेते मंडळी उपस्थित होते.

English Summary: Remove the flaws in the law, blindly the law will not get support - CM Published on: 07 October 2020, 04:05 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters