सध्या राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता धरण भरण्यास मदत होणार आहे.
आठ दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धबधबे ओसंडून वाहत असून ओढे, नाले भरून वाहत आहेत. धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.
यामुळे पुणे जिल्ह्यातील काही धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या वर गेला आहे. यामुळे लवकरच धरणे भरतील अशी शक्यता आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या भोर, मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळला आहे. मागील सात दिवसांत जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने ४२.०८ टीएमसी एवढ्या पाण्याची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील धरणसाठा ७१.०४ टीएमसी एवढा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. यामुळे आता लवकरच नदीत देखील पाणी सोडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन, जाणून घ्या..
मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या चारही धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस पडला. तर वरसगाव, पानशेत धरणक्षेत्रात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या धरणांत १.४६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.
नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर,नीरा देवघर या धरणक्षेत्रांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.
ऊस तोडणी यंत्र वापरातील आव्हाने
भात लागवड तंत्रज्ञान
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
Share your comments