गेली काही वर्षांपासून बिबट्या हा प्राणी आपल्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. बिबट्याचे हल्ले असोत अथवा बिबट सफारीवरून सुरु असलेले राजकीय नाट्य असो. मात्र बिबट्या सफारीसाठी आंदोलन करण्यापेक्षा नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याला दिसता क्षणी गोळी मारा अशी मागणी करा. असा प्रसार सोशल मिडियातून सुरु आहे. महाराष्ट्रात २०२० साली, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ८८ शेतकऱ्यांचा व ९ हजार २५८ गुरे ढोऱ्यांचा मृत्यू झाला. जखमींचा तर हिशेबच नाही असा आकडा मांडून बिबट्या शेतकऱ्याचा कसा दुश्मन आहे हे स्पष्ट केले जात आहे.
वन्यजीव जगले पाहिजेत हे योग्य असले तरी शेतकरी आणि पाळीव प्राणी देखील जगले पाहिजेत. त्यामुळे यातून योग्य मार्ग अभ्यासकांसह सरकारने काढणे अपेक्षित असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शिवाय शहरात (हडपसर, पुणे) शिरलेला बिबट्या १५ तासात जेरबंद केला जातो. तर ग्रामीण भागात ३ ते ४ महीने धुमाकूळ आणि दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्यासाठी 'पिंजरा लावा' आंदोलन करावे लागते.
हा प्रकार अयोग्य असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात धुडगूस घालणाऱ्या रान डुक्करांपासून ते दहशत पसरवणाऱ्या बिबट्यांपर्यंत सर्व वन्य प्राण्यांमुळे त्या परिसरातील शेतकरी भितीच्या वातावरणात जगतात. शिवाय तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे नुकसान होते ते वेगळेच. त्यामुळे वन्य प्राणी प्रेमी संघटनांनी ज्या भागात बिबट्याचा वावर आहे. तिथे रात्री उसाच्या शेतात पाणी द्यायला जावुन दाखवा.
शहरातील प्राणीप्रेमी 'विचारवंता'ला एखाद्या बिबट्याने नरडेला धरुन फरफटत ओढुन नेऊन नदी किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सोडल्यानंतर, मग लेख लिहा म्हणाव. असा थेट प्रतिवाद शेतकरी करत आहेत. पिकांवर पडणारा कीडेचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी, अन्यायकारक धोरण राबवणारे शासन, वेळी-अवेळी पडणारा पाऊस, बदलते हवामान, घासाघीस करणारे शहरी ग्राहक, दिशाभुल करणारे विचारवंत अशी लांबलचक यादी आहे, ज्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यात भर आहे वन्यजीव प्राण्यांची. वन्यप्राणी रोही, रानडुक्कर, गवे, काळविट, वानर, वाघ, बिबटे, साप, विंचु तर काही राज्यांमध्ये हत्ती ह्यांचा उपद्रव खुपच वाढला आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांची खुप नासाडी होत असून पशुधनाचे आर्थिक नुकसान होत आहे. या जनावरांच्या उपद्रवाने शेतकरी खुप त्रस्त झालेला आहे. एका ठिकाणी तर आईच्या कुशीत झोपलेले तान्हे बाळ बिबट्याने पळवले. या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना वावरात मुक्तपणे निर्भयपणे वावरण्याचे स्वातंत्र्य नाही. वन्यप्राणी व मानव संघर्षाचा अभ्यास करून सुवर्ण मध्य काढुन वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स अध्यक्ष सतीश देशमुख यांनी मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कशाला मोठी पीक घेता, उन्हाळ्यात लावा साधी काकडी, कमी दिवसात लाखो कमवा..
अतिरिक्त उसावर अखेर अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा..
शेतकऱ्याचा नादच खुळा! तब्बल दीड एकरात खोदली विहीर, पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला..
Share your comments