MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

पंधरा ऑक्टोबरपासून सोयाबीन विक्रीची नोंदणी; परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांत हमीभावाने खरेदी

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे मूग (प्रतिक्विंटल ७२७५ रुपये), उडीद (प्रतिक्विंटल ६३०० रुपये) खरेदीसाठी मंगळवार (ता.५) पासून नोंदणी सुरु करण्यात आली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे मूग (प्रतिक्विंटल ७२७५ रुपये), उडीद (प्रतिक्विंटल ६३०० रुपये) खरेदीसाठी मंगळवार (ता.५) पासून नोंदणी सुरु करण्यात आली.

सोयाबीन (प्रतिक्विंटल ३९५० रुपये) खरेदीसाठी शुक्रवार (ता.१५) पासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे, ही माहिती राज्य सहकारी पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर,बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी, तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत व गंगाखेड या केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे. या केंद्रांच्या ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने शेतकरी नोंदणी सुरु करण्यासाठी संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहेत.

 

दरम्यान, मानवत येथे यंदा राज्य सहकारी पणन महासंघातर्फे खरेदी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. परंतु तूर्त मानवतचे नाव विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या यादीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नोंदणीसाठी कागदपत्रे–
तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा, जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केले.

English Summary: Registration of soybean sales from October 15; Guaranteed purchase in 15 centers in Parbhani, Hingoli district Published on: 08 October 2021, 10:06 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters