1. बातम्या

पीएम किसान: 10 वा हफ्ता मिळविण्यासाठी नोंदणी करा; जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई- प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारद्वारे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ प्रदान केला जातो. दरवर्षी 6 हजार रुपयांचा रोख निधी शेतकऱ्यांना अदा केला जातो. ही रक्कम तीन समान हफ्त्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. आजापर्यंत केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
pm kisaan

pm kisaan

मुंबई- प्रधान मंत्री सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारद्वारे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक लाभ प्रदान केला जातो. दरवर्षी 6 हजार रुपयांचा रोख निधी शेतकऱ्यांना अदा केला जातो. ही रक्कम तीन समान हफ्त्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. आजापर्यंत केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत.

किसान नोंदणी प्रक्रिया टप्प्यानुसार जाणून घेऊया:

तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि अद्याप नोंदणी केली नसल्यास आता त्वरा करण्याची आवश्यकता आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात 10 वा हफ्ता लवकरच वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. 

1. तुमचा मोबाईल किंवा कॉम्पुटर द्वारे पीएम किसान वेबसाईट उघडा.

2. तुम्हाला उजव्या कोपऱ्यात ‘फार्मर कॉर्नर’ दिसून येईल.

3. ‘फार्मर कॉर्नर’ वर नवीन शेतकऱ्यांची नोंदणी वर क्लिक करा.

तुमच्यासमोर नवीन पेज उघडले जाईल.

4. तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून तुमच्या पसंतीची भाषा निवडावी लागेल.

5. ग्रामीण शेतकरी नोंदणी आणि शहरी शेतकरी नोंदणी मधून योग्य पर्याय निवडल्यानंतर आधार व मोबाईल नंबर एन्टर करा.

6. ड्रॉप डाउन यादीमधून राज्याचे नाव निवडा. कॅप्चा कोड एन्टर करा आणि ‘OTP पाठवा’ वर क्लिक करा.

तुमच्या आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. OTP एन्टर केल्यानंतर कॅप्चा कोड एन्टर करावा लागेल. तुम्ही एन्टर केलेला OTP अचूक आढळल्यानंतर नवीन पेज उघडले जाईल.

7. तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.

8. राज्य, जिल्हा, प्रांत, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा.

 

9. शेतकऱ्याचे नाव, लिंग, कॅटेगरी, शेतकऱ्याचा प्रकार, IFSC कोड, बँकेचे नाव, खाते नंबर, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर इ. तपशील भरल्यानंतर आधार साठी सादर करा वर क्लिक करा. अधिकृत करा वर क्लिक करा

10. सर्व्हे नंबर, जमीनीचा खाते नंबर एन्टर करा

11. जमीनीचे तपशील, आधार कार्ड नंबर आणि बँक पासबुक अपलोड करा

12. स्वयं घोषणापत्रावर टिक करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा

English Summary: registration for pm kisaan samman nidhi yojana Published on: 14 October 2021, 10:04 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters