ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने काढणीच्या हंगामात असलेला लाल कांद्याला फटका बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध होणारा कांदा कमी परत प्रतवारीचा येत असून सहाजिकच त्याला कमी भाव मिळत आहे. या पावसात भिजलेल्या कमी प्रतवारी चा कांद्याला हवा तेवढा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
अवकाळी पावसाने काढणी झालेल्या कांद्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले. लाल कांद्याची काढणी डिसेंबर महिन्यात सुरू होते मात्र नेमके याच वेळी अवकाळी पाऊस आल्याने काढलेला कांदा भिजला आणि शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या बाजारामध्ये दाखल होणाऱ्या लाल कांद्याची प्रतवारी चांगली नसल्याने जिकडे आवक होत आहे त्यापैकी 75 टक्के लाल कांद्याच्या प्रकारे वर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
या सगळ्या कारणांमुळे लाल कांद्याला परराज्यातून देखील मागणी फारच कमी आहे. त्यामुळे जो भाव मिळेल त्या भावात लाल कांद्याची विक्री शेतकरी करीत आहेत. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने त्याला विक्रीसाठी परराज्यात पाठवणे देखील शक्य नाही. लाल कांदा काढणीनंतर जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस टिकतो. नगर जिल्ह्याचा विचार केला तर पारनेर, श्रीगोंदा तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील लाल कांद्याची आवक होत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लाल कांद्याला चांगला भाव असतो त्यामुळे उशिरा निघालेला लाल कांद्याची आवक वाढून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून पैसे हातात मिळतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगाव सारख्या कांद्याचे मोठ्या बाजारपेठा असून त्याची लाल कांद्याची आवक वाढली आहे. मागणीपेक्षा कांद्याची आवक वाढल्याने एका आठवड्यातच क्विंटल मागे 900 रुपयांची घसरण झाली. अवकाळी पावसाचा फटका हा नवीन लाल कांद्याला बसला आहे. त्यामुळे पुढील एक दीड महिन्यापर्यंत लाल कांद्याला भाव मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Share your comments