1. बातम्या

महाराष्ट्र मेट्रोमध्ये टेक्निशियन, इंजीनियर्ससह अनेक पदांवर भरती

महाराष्ट्र रेल्वे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी चालून आले आहे. प्राप्त माहितीनुसार, टेक्निशियन, इंजीनियर्स अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
महाराष्ट्र रेल्वे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये नोकरीची संधी

महाराष्ट्र रेल्वे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये नोकरीची संधी

महाराष्ट्र रेल्वे मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी चालून आले आहे. प्राप्त माहितीनुसार, टेक्निशियन, इंजीनियर्स अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेट्रोकडून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. यासाठीचा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२१ आहे.

  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून पुणे रेल्वे प्रकल्पांतर्गत अनेक पदांवर भरतीसाठी विविध शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आला आहे. त्यामध्ये १० पास ते पदवीधरांना अर्ज करण्याची संधी आहे. टेक्निशियन पदासाठी १० पास असलेले उमेदवार एनसीवीटी/ एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून आयटीआय प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. तसेच स्टेशन कंट्रोलर आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबंधित तीन वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विभाग अभियंता पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून BE किंवा B.Tech टेक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

 सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष ते कमाल वय २८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

 अर्जासाठी शुल्क

 सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये फी भरावी लागणार आहे. तसेच इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

 निवड पद्धत

 महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी सगळ्या प्रकारचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचा लेखी आणि तोंडी इंटरव्यू देखील घेतला जाईल.

 

अर्ज कसा कराल?

 महाराष्ट्र मेट्रोच्या mahametro.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२१ आहे.

English Summary: Recruitment of Technicians, Engineers and many other posts in Maharashtra Metro Published on: 05 January 2021, 05:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters