1. बातम्या

इलेक्ट्रिनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये टेक्नीकल ऑफिसरची भर्ती

अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते, अशा उमेदवरांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रिनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (ECIL) टेक्नीकल ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. साधरण ६५० जागा भरल्या जाणार असून योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठव्यावेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
इलेक्ट्रिनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी

रिक्त जागांची संख्या  -६५०

योग्यता

तांत्रिक अधिकारी ( टेक्नीकल ऑफिसर) पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरींग / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स  आणि  इंस्ट्रूमेंटेशनअभियांत्रिकी / यांत्रिकी अभियांत्रिकी / संगणक विज्ञान अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञानतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक तारीख -

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची  तारीख -  ६ फेब्रुवारी

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  - १५ फेब्रुवारी

कॉल लेटर प्रसारित करण्याची तारीख - २० फेब्रुवारी

कागदपत्रे पडताळणी तारीख (डॉक्यूमेंट वेरिफिकेशन) - २५ ते २७ फेब्रुवारी

वयोमर्यादा -

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ जानेवारी २०२१ ला ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. राखीव वर्गातील उमेदवरांना नियमानुसार वयात सूट दिली जाणार आहे.

दरम्यान अधिकृता सुचनेसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://careers.ecil.co.in/advt0821.php?ref=inbound_article

English Summary: Recruitment of Technical Officer in Electronics Corporation of India Limited Published on: 09 February 2021, 04:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters