1. बातम्या

FSSAI मध्ये सहाय्यक संचालक ते व्यवस्थापक पदांची भर्ती; त्वरीत करा अर्ज

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणात नोकरी करण्याची ज्या उमेदवारांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एफएसएसएआय FSSAI मध्ये विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणात नोकरी करण्याची ज्या उमेदवारांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.  कारण एफएसएसएआय FSSAI मध्ये  विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत.  दरम्यान याविषयीची सूचना प्रसिद्ध झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार २ नोव्हेबर २०२० आधी अर्ज करु शकतात.

पदांचा तपशील  -

पदांचे नाव -

प्रशासनिक अधिकारी -१४

सहाय्यक - ६

वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी) - १

वरिष्ठ प्रबंधक व्यवसाथापक - १

व्यवस्थापक  - (आयटी) - २

व्यवस्थापक  -२

उप व्यवस्थापक - ४

वरिष्ठ

वरिष्ठ खाजगी सचिव - ४

व्यक्तिगत सचिव - 15

सल्लागार - १ 

निर्देशक  - ४ (तांत्रिक -२, प्रशासन व वित्त -२)

संयुक्त निदेशक - १ तांत्रिक

उप निदेशक  - १ (अ‍ॅडमीन आणि फायन्सास)

सहाय्यक संचालक - १ (लीगल)

सहाय्यक संचालक - Tech -

सहाय्यक संचालक  (OL) - ८

(Education Eligibilty) शैक्षणिक योग्यता

उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून मास्टर डिग्री किंवा पदवीत्तुर  डिप्लोमा / बीई किंवा बीटेक एमटेक / बॅचलर डिग्री / लॉ / पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री / एमबीए अन्न सुरक्षा तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची मर्यादा  - उमेदवाराचे वय ५६ वर्ष असणे.

FSSAI भर्ती 2020:  अर्ज कसा करणार -

कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.  FSSAI च्या वेबसाईटवर gov.in वर  ऑनलाईन अर्ज करु शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख  - २ नोव्हेंबर  २०२०

Advertisement जॉब्स @ FSSAI ’ वर क्लिक करा आणि ई -12017/01/2020 - HR ” जाहिरात शोधा.

सूचना काळजीपुर्वक वाचा, सर्व माहिती वाचून अर्ज भरावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट घ्यावी.

एनओसी किंवा सीसीए मंजुरी अपलोड केल्याशिवाय आपला अर्ज सबमिट करू शकणार नाहीत. दरम्यान आवश्यक कागदपत्रासह अर्जदाराने प्रमाणित केलेले ऑनलाईन अर्ज पत्राची एक हार्ड कॉपी ११ नोव्हेंबर २०२० च्या आधी सहाय्यक निदेशक (एचआर), एफएसएसआय, एफडीए भवन, कोटला रोड नवी दिल्ली या पत्तावर पोस्टाने पाठवावे.

English Summary: Recruitment of Assistant Director to Manager posts in FSSAI, apply quickly Published on: 02 October 2020, 11:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters