1. बातम्या

नॅशनल फर्टिलाइजर्समध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या, अंतिम तारीख अन् अर्जाची माहिती

नॅशनल फर्टिलाइजर्स म्हजेच एनएफएलमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. या कंपनीत विविध पदांची भर्ती होणार असून त्यासंबंधीची जाहिरात कंपनीने प्रसिद्ध केली आहे.

KJ Staff
KJ Staff


नॅशनल फर्टिलाइजर्स म्हणजेच एनएफएलमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे.  या कंपनीत विविध पदांची भर्ती होणार असून त्यासंबंधीची जाहिरात कंपनीने प्रसिद्ध केली आहे.  या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे.  अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २७ मे २०२० आहे, या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदांचा तपशील -

(Total Posts)  पदांची एकूण संख्या  - ५३

(Name of Posts) पदांचे नाव :

-इंजीनियर अभियंता

मैनेजर - व्यवस्थापक

सीनियर केमिस्ट - वरिष्ठ केमिस्ट

(Age limit)वयाची मर्यादा : या पदांसाठी उमेदवारांचं वय ४५ वय वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

(Education Eligibility) शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता असलेल्या विद्यापीठातून उमेदवारांने (B.Tech/60 percent mark) ६० टक्क्यांसह बीटेक केलेले असने आवश्यक.

(Monthly Salary)मासिक वेतन  : E-1 आणि E-4 पातळीवर ७ व्या वेतन आयोगाच्या पीएसयू (PSU) कंपन्यांना निश्चित करण्यात आल्या प्रमाणे वेतन दिले जाईल.  यानुसार, E-1 च्या स्थरावरील वरिष्ठ केमिस्ट आणि अभियंता या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ४० हजार रुपयाचे वेतन सुरुवातील दिले जाणार आहे.  E-4 च्या पातळीवरील व्यवस्थापक या पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ७० हजार रुपये मासिक वेतन सुरुवातीला दिले जाईल. यासह मूलभूत वेतनासह भत्ता व आयडीए, एचआरए, कंपनी गृहनिर्माण इत्यादी सुविधा देण्यात येतील.

(How to Apply) कसा करणार अर्ज

या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. सर्वात आधी अधिकृत वेबसाईट nationalfertilizers.com वर जाऊन अर्ज डाऊनलोड करुन घ्या.   त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर संबंधित भरती जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवा पेजवर जाहिरात आणि अप्लीकेशन फॉर्मा डाऊनलोड (Application Proforma Download ) पीडीएफ फॉर्म मध्ये डाऊनलोड करण्याची लिंक मिळेल.  अर्जासह सांगितलेले कागदपत्रे जोडावे. २७ मे २०२० पर्यंत हे अर्ज कंपनीकडे पाठवावेत.

English Summary: recruitment in NFL; grap the Opportunity Published on: 01 May 2020, 05:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters