1. बातम्या

NABARD कंसल्टेंसी सर्व्हिसेसमध्ये भरती: करा लवकर ऑनलाईन अर्ज ; जाणून घ्या पात्रता

कृषी क्षेत्रात पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पदवी घेतलेल्या व्यक्तींना नाबार्डच्या NABARD कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) मध्ये नोकरी करण्यासची संधी मिळणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


कृषी क्षेत्रात पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पदवी घेतलेल्या व्यक्तींना नाबार्डच्या NABARD कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) मध्ये नोकरी करण्यासची संधी मिळणार आहे.यासाठी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. नाबार्डने आपल्या संकेतस्थळावर या भरतीविषयीची सुचना जाहिर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी २९ मे २०२० पर्यंत अर्ज जमा करायचे आहेत. २९ तारखेनंतर येणाऱे अर्ज रद्द करण्यात येतील.

पदांची तपशील 

पदांचे नाव (Name of Posts):

टीम लिडर -( एग्रीकल्चर इंजिनिअरिंग )

असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (इरिग्रेश, एग्रीकल्चर )

असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (MIS)

डेटा मॅनेजर 

असिस्टेंट डेटा मॅनेजर

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज झाल्याची तारीख  - १८ मे २०२०

ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - २९ मे २०२०

शैक्षणिक पात्रता

1) टीम लिडर (एग्रीकल्चर इंजिनिअरिंग) उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीत्तुर एग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये पदवी व कृषी या संबंधित क्षेत्रात सरकारी प्रकल्पांवरती किमान २० वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2) असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (इरिग्रेश, एग्रीकल्चर )  उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून एग्रीकल्चर इंजिनिअरिंग , एग्रीकल्चरमध्ये पदवीत्तुराची डिग्री घेतलेली असावी.

वयाची मर्यादा  (Age Limit)

टीम लीडर (एग्रीकल्चर इंजिनिअरिंग): यासाठी उमेदवाराचे वय  जास्तीत जास्त  ५५ वर्ष असावे.

असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (इरीगेशन / एग्रीकल्चर / MIS), डाटा मॅनेजर, सहाय्यक  डेटा मॅनेजर:

यासाठी उमेदवाराचे वय ४० वर्ष असावे.

पगार  - टीम लिडरसाठी - निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन ५५ हजार रुपये असणार आहे.

असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (इरीगेशन / एग्रीकल्चर) - या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे मासिक वेतन ५० हजार रुपये असणार आहे.

असोसिएट प्रोजेक्ट कंसल्टेंट (MIS) - पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महा ४० हजार रुपये वेतन दिले जाईल.

डेटा मॅनेजर - निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये इतका पगार असेल.

असिस्टेंट सहाय्यक डेटा मॅनेजर - निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपये इतके वेतन मिळेल.

आवेदन कैसे करें (How to Apply)

अर्ज कसा करणार - इच्छुक उमेदवार  २९ मे २०२० पर्यंत ऑनलाईनने या पदांसाठी अर्ज करु शकता. या पदाविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार NABCONS चे अधिकृत संकेतस्थळ http://www.nabcons.com/ वर भेट द्यावी.

English Summary: Recruitment in NABARD Consultancy Services, Apply Online Early ; know the Eligibility Published on: 22 May 2020, 02:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters