पुणे महानगरपालिकेने वैद्यकीय कर्मचार्यांच्या अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग ऑर्डली (N.O.), एएनएम आणि आया या पदांवर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार २ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.पीएमसी भरती 2021 द्वारे एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्जाची माहिती तपासून घ्यावी. भरतीसाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे
रिक्त पदांचा तपशील
वैद्यकीय अधिकारी - १०० पदे
नर्सिंग ऑर्डर्ली - १०० पदे
एएनएम - १०० पदे
एकूण रिक्त पदे - ४००
पात्रता
आठवी इयत्ता आठवी / दहावी / MSCIT / ANM कोर्स / BAMS / MBBS पदवी आदि विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक. पदांनुसार शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी आपण पुढे दिलेल्या अधिसूचना लिंकवर क्लिक करू शकता.
https://www.pmc.gov.in/sites/default/files/recruitment/add%2044%20days%20upto%206%20months.pdf
पदानुसार वेतन
मेडिकल ऑफिसर (MBBS) - ६०,००० रुपये
मेडिकल ऑफिसर (BAMS) - ४०,००० रुपये
नर्सिंग ऑर्डर्ली - १६,४०० रुपये
एएनएम (ANM) - १८,४०० रुपये
आया - १६,४०० रुपये
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा जास्तीत जास्त ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकता. अर्ज पुढील पत्त्यावर पाठवायचा आहे - पीएमसी मुख्य भवन, मंगला थिएटरजवळ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पीडीएफ पाहावी.
Share your comments