1. बातम्या

नोकरीची बातमी : नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त, महिला कर्मचारी परिचारिका, सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, मल्टी-टास्किंग स्टाफ पोस्ट यापदांसाठी भरती होणार आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Navodaya Vidyalaya Samiti

Navodaya Vidyalaya Samiti

नोकरीची बातमी : नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त, महिला कर्मचारी परिचारिका, सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, मल्टी-टास्किंग स्टाफ पोस्ट यापदांसाठी भरती होणार आहे.

पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता

1 असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) 05 मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

2 असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A) 02 (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

3 स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) 82 (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.

4 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) 10 (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.

5 ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) 11 B.Com

6 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) 04 (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

7 ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) 01 (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

8 स्टेनोग्राफर (ग्रुप-C) 22 (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)

9 कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) 04 (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.

10 कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) 87 10 वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

11 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) 630 (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

12 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) 273 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव

13 लॅब अटेंडंट (ग्रुप-C) 142 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

14 मेस हेल्पर (ग्रुप-C) 629 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव

15 मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) 23 10वी उत्तीर्ण

वयाची अट - 10 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3, 6, 7, & 10 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15: 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 & 11: 18 ते 27 वर्षे
पद क्र.12: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

नवोदय विद्यालय समिती परीक्षा फी
Fee: [SC/ST/PH: फी नाही]
पद क्र. 1 & 2: General/OBC: ₹1500/-
पद क्र. 3: General/OBC: ₹1200/-
पद क्र. 4 ते 12: General/OBC: ₹1000/-
पद क्र. 13, 14 & 15: General/OBC: ₹750/-

English Summary: Recruitment for 1925 posts in Navodaya Vidyalaya Samiti Published on: 15 January 2022, 03:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters