कोलकाता: कोरोना व्हायरसमुळे एप्रिल आणि मे महिन्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन तसेच आसाममध्ये झालेल्या दमदार पावसामुळे चहाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उद्योगातील विशेषज्ञांच्या मते चहा उत्पादनात मोठ्या प्रमणात घट आली आहे. यामुळे देशातील बाजारात चांगल्या गुणवत्ता असलेल्या चहाचे दर वाढले आहेत. साधरण प्रतिकिलो १०० रुपये दर झाला आहे. दरम्यान भारतीय चाय संघ आयटीए च्या मतानुसार उत्तर भारत आसाम आणि उत्तरेकडील बंगालमध्ये यावर्षाच्या जानेवारी ते जून दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत चहाचे उत्पादन ४० टक्के घटले आहे.
भारत चहा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. व्यापारिक सूत्रांनुसार भारतीय चहा उद्योगाला किंमत वाढ मदत करू शकते. कारण सध्या चहा उद्योग खूप अडचणीत सापडला आहे. दरम्यान भारतीय चहाच्या किंमती वाढल्याने जागतिक बाजारात केन्या आणि श्रीलंकेच्या चहाला प्राधान्य मिळू शकते.
यामुळे भारतीय चहा उद्योगांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आयटीएचे सचिव अरिजीत यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही जुलै महिन्याचे आकड्यांची वाट पाहत आहोत. ते पुढील काही दिवसात येतील. अलीपूरद्वार आणि जलपाईगुडीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने चहाची पाने तोडणीत घट झाली आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी झालेली लिलावात चहाचे दार अधिक होते. उद्योगांना साधऱण २० कोटी किलोग्रॅमचे नुकसान झाल्याचा अनुमान विजय जगन्नााथ यांनी लावला आहे. देशातील बाजार मिळणारी चांगल्या प्रतीची चहाचे दर वाढले असून प्रतिकिलो १०० रुपये झाली आहे.
Share your comments