सध्या लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agricultural Produce Market Committee) मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या लाल मिरचीला सर्वांधिक म्हणजे सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. त्यामुळं चटणीचा दर देखील दुप्पट होणार आहेत. नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी नंदूरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असते. याठिकाणी लाखोंची उलाढाल होत असते.
राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळं यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यामुळे सध्या हे दर वाढू लागले आहेत. तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड होते. मात्र याठिकाणी देखील आता पावसामुळे लागवड कमी झाली आहे.
इथेनॉलच्या किमती वाढणार, खतांवर सबसिडीही मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
मागील वर्षीपेक्षा सध्याचे दर हे दुप्पट झाले आहेत. मागील वर्षी नंदूरबार बाजार समितीत 2 हजार 500 ते 5 हजार पर्यंतचे दर होते. मिरचीचे भाव वाढल्यामुळं सर्वसामान्यांच्या किचनमधील मसाल्याचे पदार्थ आणि चटणी यांचे दरही वाढत आहेत. यामुळे आता तिखट भाज्या कमी होण्याची शक्यता आहे.
काय सांगता! आता पिकाचे भविष्य आधीच कळणार, पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप
सध्या चांगला भाव मिळून देखील शेतकऱ्यांमध्ये असमाधानीचं वातावरण दिसून येत आहे. कारण परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
'शेती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकार कृषी स्टार्टअप्सना मदत करत आहे'
छत्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकला! जाचक-घोलप-काकडे एकाच व्यासपीठाव
सरकारने जाहीर केली मदत! अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
Share your comments