वादग्रस्त कृषी कायद्यासंबंधी शेतकरी संघटना केंद्र सरकार सोबत पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते राकेश तिकैत यांनी रविवारी म्हटले. परंतु त्यांचे म्हणणे आहे की, जर चर्चा झाली तर ही चर्चा कृषी कायदे मागे घेण्या विषयी असायला हवी. पुढे ते म्हटले की शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे किंवा आंदोलन स्थळावरून माघारी परतण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जेव्हा सरकार या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असेल तेव्हा संयुक्त शेतकरी संघटना सरकारची चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सरकार चर्चेसाठीतयार आहे, आम्ही फक्त एक कॉल दूर आहोत असे सरकारने म्हटले होते. आता मी पत्र लिहिले परंतु अद्याप आम्हाला या पत्राला उत्तर मिळालेला नाही असही राकेश टीकैत यांनी म्हटले.
स्वतंत्र सैनिक शहीद भगत सिंह यांचे भाचे अभयसिंह संधू यांचे नुकतेच कोविड संक्रमणा सहीत इतर समस्यांमुळे मृत्यू झाला. संधू यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राकेश तिकैत मोहली मध्ये दाखल झाले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. दुसरीकडे हरियाणातल्या हिस्सार भागात सुरू असलेल्याशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
जिल्ह्यांमध्ये गेल्या रविवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात तीनशेहून अधिक शेतकरी विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन अजून तीव्र झाले आहे. कोरोना संक्रमण काळातच गेल्या सहा महिन्यांहून अधिक दिवस शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिमे वर आंदोलन सुरू आहे. कोरोना संक्रमाना दरम्यान आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पंधरा दिवस लेट केले जात, असं म्हणताना सरकारांना आंदोलकांच्या लसीकरणासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Share your comments