1. बातम्या

काय शेतीची खातेफोड करत आहात? सोप्या शब्दात समजून घ्या प्रक्रिया

जर भारतातील ग्रामीण भागाचा विचार केला तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. एकत्र कुटुंब पद्धत असलेला घरातील कारभारी असलेली जमीन कसायला आणि कुटुंबातील सर्वांचा उदरनिर्वाह करायचा.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतजमिनीची खातेफोड

शेतजमिनीची खातेफोड

 जर भारतातील ग्रामीण भागाचा विचार केला तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. एकत्र कुटुंब पद्धत असलेला घरातील कारभारी असलेली जमीन कसायला आणि कुटुंबातील सर्वांचा उदरनिर्वाह करायचा, अशी साधारण पद्धत आहे.

जर भारतातील ग्रामीण भागाचा विचार केला तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. एकत्र कुटुंब पद्धत असलेला घरातील कारभारी असलेली जमीन कसायला आणि कुटुंबातील सर्वांचा उदरनिर्वाह करायचा, अशी साधारण पद्धत आहे. परंतु कालांतराने एकत्र कुटुंब पद्धतीला फाटा दिला गेल्याने भावा-भावांमध्ये जमिनीच्या संबंधित वाद सुरू झाले. घरातील कुणी जमिनीवर कर्ज काढण्याची प्रयत्न करतो तर कोणी जमीन तोड बटाईने देऊन पैसे घेऊन आणि व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पेटली..

हेही वाचा : फक्त शंभर रुपयात होईल शेतजमीन नावावर

त्यामुळे जमिनीचे खाते फोड करून जमिनीची योग्य वाटणी मुलांना किंवा आपल्या वारसांना करून घेण्याकडे कल वाढला. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी खातेफोड प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने किंवा त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने ही प्रक्रिया गुंतागुंतीची होऊन बसले.  खातेफोड प्रक्रिया कशी आहे याबाबत या लेखात माहिती घेऊ.

काय आहे खातेफोड प्रक्रिया?

महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 85 प्रमाणे जमिनीची खातेफोड केली जाते. त्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार ज्या कुटुंबाच्या जमिनीचे खातेफोड करायचे आहे, त्या कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र बसून संबंधित विषयावर चर्चा करावी. अंतिम निर्णय कसा ठरला याबाबत सर्वांमध्ये कच्चा आराखडा तयार करावा. यामध्ये चतुर्सिमा दर्शवावी लागते.

खातेफोडसाठी सर्वांची सहमती अत्यावश्यक

 खातेफोडसाठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित गट नंबरमध्ये जेवढे जमीनधारक व त्यांचे अपत्य आहेत, त्या सगळ्यांची संमती असणे आवश्यक असते. यामध्ये एकाचे जरी संमती नसली तरी खातेफोड होत नाही.

 विहित नमुन्यातील फॉर्म

 यासंबंधीची प्रक्रिया पार पडल्यानंतर विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासोबत सातबारा उतारा अधिक आवश्यक कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयात संबंधित विभागात तो प्रस्ताव दाखल करावे लागतात. सदरचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो योग्यरीत्या तपासून तहसीलदार प्रत्येकाला नोटिशीद्वारे कळवून सुनावणीसाठी तारीख देतात. हे सुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षकांना आदेश देतात. त्याप्रमाणे नोंद करून ती मंजूर करून घ्यावी लागतात आणि नंतरच ठरल्याप्रमाणे सातबाराचे उतारे वेगळे होतात.

हेही वाचा : विहिरीसाठी करा या योजनेचा; अर्ज सरकारकडून मिळते अनुदान

 

फॉर्ममध्ये भरावयाची माहिती

 हा फार्म एकूण दहा पाणी असतो. यामध्ये जमिनीचा तपशील, 29 जमिनीचे क्षेत्र, घोषणा फॉर्म, तलाठ्याचा आदेश, सर्वांचे प्रतिज्ञापत्र, नोटिसा, जमीन वाटपासंबंधी तपशीलवार माहिती, अंतिम आदेश इत्यादी माहिती असते.

English Summary: Read whole process of khate phod Published on: 02 January 2021, 01:13 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters